•ठाणेदार अजित जाधवांचा मार्गदर्शनाने डीबी पथकाला यश
अजय कंडेवार,वणी:- मागील ४ महिन्यापासून मनमाड, येवला, नाशिक, पुणे येथे पोलीसांना हुलकावणी देत फिरणारा वणी डी बी पथकाचा हातात लागला असून गजानन मधुकर चव्हाण (वय ३०, रा. मोहोर्ली ) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. डीबी पथकाने त्याला अटक केली असून, त्याचाकडून आणखी काही माहिती मिळेल या आशेने सोमवार पर्यंत रिमांडवर घेण्यात आले.
सविस्तर , मनीष पुरुषोत्तम बोढे (वय -३२ वर्ष) रा. जैन ले आउट वणी दि.24 एप्रिल रोजी पो.स्टे.वणी येथे दुचाकी चोरीची तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीत लाल काळया रंगाची फॅशन प्रो. क्र.MH 34-Y-7979 ही दुचाकी गांधी चौकातून अज्ञाताने चोरून नेल्याची ३७९ भादवि या कलमासह गुन्हा नोंदही करण्यात आला. गुन्हयाचे तपासात चोरी गेलेली दुचाकी हसन शेख शफी वय (३० वर्षे रा.कायर वार्ड क.०३) याचाकडे सापडली त्याला विचारपुस केले असता ही गाडी अर्जुन तांदुरकर रा.मोहूर्ली यांचेकडुन 9000 रूपयात विकत घेतली असल्याचे सांगितले व पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गजानन मधुकर चव्हाण ( रा. मोहोर्ली) याचाकडून 4500 रुपयात विकत घेतले असल्याचे सांगीतले .गजानन मधुकर जाधव याचा गावात शोध घेतले असता तो गावात सापडलाच नाही.डी.बी पथक प्रमुख सपोनि शिंदे यांना गुन्हयातील मुख्य आरोपी गजानन मधुकर चव्हाण हा लोणी काळभोर ता.हवेली जि.पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्याला शिताफीने लोणी येथून ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारणा केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली.गुन्हयात अटक करून वि.कोर्ट वणी येथे हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सदरची कार्यवाही डॉ. पवन बनसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ) ,पियुष जगताप (अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ) गणेश किद्रे (उप.वि.पो.अ. वणी) यांचा आदेशाने पो.नि अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख सपोनि / माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उबरकर, हरीन्द्रकुमार भारती,विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली असुन पुढील तपास सुदर्शन वानोळे करीत आहे.

