Saturday, August 29, 2026
HomeBreaking NewsMurder : "मंदर " येथील खुनाचा LCB कडून उलगडा.....

Murder : “मंदर ” येथील खुनाचा LCB कडून उलगडा…..

सीसीटीव्ही फुटेज ठरला क्लू. •एक आरोपी जेरबंद, तपासाचे सर्वत्र कौतुक . •वाचा खुनाचे मुख्य कारण......

Ajay kandewar, Wani :- तालुक्यातील घुग्घुस रोडवरील एका बारसमोर मंदर शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. अत्याधुनिक तपास पद्धती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत हे प्रकरण सोडवले.प्राप्त माहितीनुसार, दि. १८ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी घुग्घुस रोडवरील एका बारसमोर मंदर शिवारात नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले. मृतकाची ओळख देवराव गुंजेकर अशी पटली. या घटनेनंतर मृतकाच्या भाचीने वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करण्यात आले. त्यातून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. अखेर खात्रीलायक क्लू मिळाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.तपासातून आरोपीचे नाव आशिष संजय कटोते (२५), रा. वागदरा असे समोर आले. दि. २६ ऑगस्ट रोजी मंगळवारी संध्याकाळी नांदेपेरा रोड परिसरातून त्याला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुलीही आरोपीकडून मिळाली आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक होत असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वाढते महत्त्व व गुन्हे उकलण्यात त्यांचा प्रभावी वापर याचा हा ठळक दाखला ठरला आहे.

सदर कार्यवाही यवतमाळ पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, Dysp सुरेश दळवे,LCB P.I सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात API दत्ता पेंडकर, PSI धनराज हाके,सुधीर पांडे,सुनील खंडागळे, सुधीर पिदूरकर,नीलेश निमकर,सलमान शेख,नरेश राऊत,सतिष फुके,पठाण सर्व स्था.गु.शा. यवतमाळ तसेच PSI धिरज गुल्हाने व डिबी पथक पो.स्टे.वणी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

वाचा.. खुनाचे कारण….

दारूचे व्यसन आणि पैशांचा वाद – थडग्यात पोचला गुंजेकर…..

आरोपी आशिष संजय कटोते याच्या खिशातील १० हजार रुपये व मोबाईल फोन चार दिवसांपूर्वी लालगुडा चौक परिसरात तो दारू पिऊन झोपलेला असताना चोरीस गेले होते. नंतर या पैशांची व मोबाईल चोरीची माहिती मृतक देवराव गुंजेकर यानेच केली असल्याचे आरोपीला कळले.याच कारणावरून सूडाच्या भावनेतून आरोपीने घटनेच्या दिवशी मृतक गुंजेकर याचा लालगुडा चौकातून शोध घेतला. त्याला मोटरसायकलवर बसवून दारू पिण्याच्या बहाण्याने घटनास्थळी नेण्यात आले. तेथे मोबाईल व पैशांबाबत विचारणा केली असता मृतकाने कोणतीही कबुली दिली नाही. यामुळे संतापलेल्या आरोपीने मृतकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात दगडाने वार करून त्याचा खून केला, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page