देव येवले,झरी : शिवसेना झरी तालुक्याच्या वतीने मुकुटबन येथे आयोजित केलेल्या MPL (मुकुटबन प्रीमियर लीग) क्रिकेट सामन्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संतोष माहुरे यांच्या हस्ते 24 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता अतिशय उत्साही वातावरणात हा उदघाटन सोहळा पर पडला.
झरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील खेडाळूच्या कौशल्याला प्रेरणा मिळावी व खेडाळूची राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आपल्यातील आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचा उद्देशाने या MPL (मुकुटबन प्रीमियर लीग) चे आयोजन करण्यात आले. यासाठी आठ संघ तयार करण्यात आले. झरी तालुक्यातील खेडाळूंना लिलाव पद्धतीने संघात स्थान देण्यात आले. या सामन्यातील लीग विजेत्यासाठी पहिले बक्षीस 55555, दुसरे 33333 तिसरे 22222 तर चौथे 11111 बक्षीस बहाल होणार आहे.
या MPL (मुकुटबन प्रीमियर लीग) च्या उदघाटनावेळी
शिवसेनेचे संपर्क प्रमुख संतोष माहुरे, ठाणेदार अजित जाधव, सरपंच मीना आरमुरवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, संतोष बरडे, संदीप विच्चू, बालू बरशेट्टीवार, सीताराम पिंगे, राजू लोडे, सर्व संघाचे ओनर, खेडाळू व परिसरातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.