Tuesday, February 17, 2026
HomeBreaking NewsM.D ड्रग्स तस्करांना LCB चा रट्टा.......

M.D ड्रग्स तस्करांना LCB चा रट्टा…….

वणीत एम.डी.ड्रग्सचा काळाबाजार उघड. •मोठा "आका"अद्यापही जाळ्याचा बाहेर.

Ajay kandewar,Wani:- शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाढणारा एम.डी. ड्रग्सचा काळाबाजार अखेर उघड झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अचानक धाड टाकताच लाखोंचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या धक्कादायक कारवाईनंतर तालुक्यातील युवक वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकत चालल्याचे सत्य उघडकीस आले असून समाजात संतापाचे वातावरण आहे.

‘वणीत’ एम.डी.चा काळा धंदा करणाऱ्या टोळक्यांचा गेम एलसीबीने एका फटक्यात गुंडाळला. पण प्रश्न असा उभा राहतो की, इतक्या दिवसांपासून या टोळ्यांना संरक्षण कुणाचे मिळाले?एवढा मोठा अमली व्यापार सुरू राहिला कसा?युवकांना खेळ, शिक्षण आणि रोजगाराकडे वळवायचे सोडून त्यांना व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या या गुन्हेगारी व्यापाराचा मूळ स्रोत समाजाने ओळखणे गरजेचे आहे. केवळ धाड टाकून माल जप्त करणे हा उपाय नाही; तर या मागे असलेले तस्करांचा आका याला तोडल्याशिवाय हा ड्रग्स राक्षस थांबणार नाही.

अनेक पालक चिंतेत आहेत की, आपली लेकरं एम.डी.च्या नशेत कुठे हरवून बसतील. समाजातील सुसंस्कृत वर्ग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर पावलं उचलली नाहीत, तर येणारी पिढी व्यसनात गढून जाण्याची भीती वास्तव ठरेल.एलसीबीची धाड स्वागतार्ह; पण आता जनतेची अपेक्षा आहे की, केवळ माल जप्त करून थांबू नये. या काळ्या धंद्याच्या मुळाशी जाऊन मोठ्या मासे पकडले नाहीत, तर एम.डी.चा वणीत खेळ पुन्हा सुरू राहीलच!

•युगांत व शहबाज सत्तार मिर्झा अटकेत.

युगांत दिनेश दुर्गे रा ह. मु. पंचशील नगर वणी व शहबाज सत्तार मिर्झा रा. साई नगरी, वणी असे दोघांना अटक करून त्यांचे विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments