Ajay,Wani:- गोवंशीय जनावरांची आंतरराज्यीय तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी पहाटे मोठे यश मिळविले. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजूर गोटा येथे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात पाठविण्याच्या तयारीत असलेले ३४ गोवंशीय बैल ताब्यात घेत पाच वाहने आणि जनावरांसह ४३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
या प्रकरणी अक्षय किशोर बोठे, अजीत दादाजी बारतीने, प्रफुल शामराव नंदुरकर, विठ्ठल शंकर उमरे, अजय भारत पिदुरकर आणि राजूर गोटा येथील ज्ञानेश्वर उर्फ नागेश तानबा भोयर यांना ताब्यात घेण्यात आले असून किशोर खडसे, निलेश खडसे तसेच तेलंगणातील काही संशयित व्यापाऱ्यांचा शोध सुरू आहे.कारवाईदरम्यान MH-34-BZ-6139,MH-40-Y-0229, MH-32-AJ-1382, MH-34-BZ-0767 व एक विना नंबरचे अशोक लेलैंड अशी एकूण ५ वाहने (किंमत रु. २६ लाख ५०,०००रु जप्त करण्यात आली. या वाहनांमधून जनावरे उतरविण्याचे काम सुरू असतानाच एलसीबीने घटनास्थळी धडक देत संपूर्ण तस्करीची साखळी विस्कळीत केली. तपासात पाच वाहनांमध्ये तसेच घटनास्थळी एकूण ३४ गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. वाहनांची किंमत २६ लाख ५० हजार, तर जनावरांची किंमत १६ लाख ६५ हजार इतकी असून जप्त करण्यात आलेल्या सर्व जनावरांना पशुवैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षिततेसाठी वणी तालुक्यातील गुरु गणेश गोरक्षण रासा येथे हलविण्यात आले. या कारवाईमुळे पैनगंगा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या गोवंश तस्करीच्या मार्गावर पोलिसांनी प्रभावी प्रहार केल्याचे मानले जात आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात P.I सतीश चवरे, API दत्ता पेंडकर, PSI सुदाम आसोरे ,सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अमीत पोयाम, रजनीकांत मडावी, सतीश फुके व मुकुटबन पोलीस ठाण्याच्या पथकाने केली

