Ajay,Wani :- तालुक्यातील वेकोलिच्या प्रगतीनगर येथील उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक ओमप्रकाश हिराप्रसाद (वय ४५) यांच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलण्यात LCB च्या ‘दत्ता टीम’ला यश आले.डोक्यावर, कपाळावर आणि चेहऱ्यावर वार करून झालेल्या या हत्येने वणी परिसर हादरला असतानाच, घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नसताना LCB पथकाने तपासाची दिशा शोधण्यासाठी रात्रभर अक्षरशः कस लावला. मोबाईल loction dumbdata व CCTV यांच्या माध्यमातून धागे जोडत अखेर अंचल मोहन उईके (वय २८, रा. प्रगतीनगर कॉलनी, कोळारपिंपरी, वणी) याला ताब्यात घेतले
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरच्या रात्री कॉलनी परिसरात रानडुकरांचा कळप आल्याने मोटारसायकलवरून पडल्याच्या कारणावरून अंचल उईके हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे १०.४० वाजता सुरक्षा रक्षक ओमप्रकाश यांनी त्याला सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र, तक्रार आताच नोंदविण्याच्या आग्रहातून दोघांमध्ये वाद झाला आणि याच किरकोळ वादाचे पर्यवसान रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक जबानी कबुलीने अक्षरशः परिसर हादरले.
विशेष म्हणजे, घटनास्थळी थेट आरोपीपर्यंत पोहोचविणारा पुरावा नसतानाही पुरावे गोळा करण्यासाठी रात्रभर जागत एलसीबी पथकाने No comment ची भूमिका बजावली. उपलब्ध माहितीची पडताळणी, तांत्रिक तपास आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी पथकाने रात्रभर तपास सुरू ठेवला. त्यामुळे या हत्याकांडाच्या तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे. मात्र,एका सुरक्षा रक्षकाचा जीव घेणाऱ्या या घटनेचा छडा लावण्यासाठी एलसीबीच्या पथकाने दाखविलेली तपासातील तत्परता सध्या वणीच्या पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
ही कारवाई यवतमाळ SP कुमार चिंता, AdSp अशोक थोरात आणि Dysp सुरेश दळवी यांच्यामार्गदर्शनाखाली LCB सतीश चवरे यांच्या नेतुत्वात करप्यात आली. API दत्ता पेंडकर, गजानन राजमलू, PSI धनराज हाके, शिवशंकर कायंदे, सागर इंगळे यां्यासह पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुूधीर पिदुरकर, सोहेल मिर्जा, मिथुन जाधव, योगेश डगवार, रुपेश पाली. किश्ोर आडे, मिलिंद दरेकर, सचिन मलाये, महेश वाकोडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, दिगंबर,पवन, आकाश सूर्यवंशी तसेच चालक नरेश राऊत, जितेंद्र चोधरी आणि सूनील मेश्राम यांचा समावेश होता
.

