•9 लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत
माणिक कांबळे /मारेगाव :- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रोहपाट रोडवरील जीवन ज्योत दवाखान्या पासून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफास करण्यात आला असून घटनास्थळी 9लाख रुपये किमतीचे 45 नग गोवंशाची सुटका करून आरोपीना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाला यश आले आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या 5 हजार रुपये सॅमसंग कपंनीचा मोबाईल असा एकूण 9 लाख 5हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.L.C.B exposes beef smuggling..9 lakh worth of goods seized, accused arrested
पायदळ तस्करी करतांना ….
तस्लिम खॉ वहाब खॉ कुरेशी ,मुकुंदा जाधव,सुनील गुंजेकार, शंकर भोजेवार,उमेश चाफले रा सर्व मारेगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत. ही पाच संशयित 45 नग बैल जातींचे जनावरे रोहपट ते करणवाडी रोडवरून तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना देण्यात आली होती.या माहितीच्या आधाराने सापळा तयार करण्यात येऊन ही धडक कारवाई करण्यात आली. या संशयिता कडून तीन तीनच्या कळपाने घेऊन जात असलेल्या 9 लाख रुपये किमतीच्या 45 जनावराना घटना स्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेण्यात आली.ही जनावरे कोणाची व कोठून आणली याबाबत विचारपूस करण्यात आली असताना त्यांनी पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ही जनावरे दिग्रस मार्गे तेलंगना राज्यात कत्तलीसाठी विक्री करिता नेणार असल्याची कबुली दिली आहे.ही कारवाई काल 30मे .च्या सायंकाळी 4.30वाजताच्या सुमारास रोहपट ते करणवाडी रोडवर करण्यात आली आहे.त्याच्या कडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला सॅमसंग कपंनीचा 5हजार रुपये किमतीचा मोबाईल,बांबूची काठी तथा 9लाख किमतीचे जनावरे असे एकूण 9लाख 5हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तस्कराच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुरुगणेश गोशाळा येथे रवाना करण्यात आले असून पशुवैधकीय तपासणीचे पत्र देवून त्यांची शारीरिक चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. संशयितावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976सहकलम 119, जनावराना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी विक्रीकरिता पायदल भर उन्हात निर्दयी पणे व क्रूरपने जनावरे घेऊन जाणे कलम 11(1)(क )(घ )(च )1960सहकलम 5अन्वये गुन्हे कायम करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षा पासून मारेगाव तालुका
गोवंश तस्करीचे केंद्र बिंदू ठरले आहे. शहरातून लाखो रुपये किमतीच्या गोवंशाची तस्करी स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिचून दरदिवशी होत आहे. गेल्या अनेक दिवसा पासून जणांवराची निर्दयी तथा क्रूरपणे तस्करी होत असताना यवतमाळ शाखेच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे, अंमलदार, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यशस्वीरित्या पार पाडली आहे.फिर्यादची दखल घेत मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस चांदेकर, सुकूरवार तथा त्यांची चमू करीत आहे.