Tuesday, April 21, 2026
HomeUncategorizedDLP काळातही बिले उचलली; रस्ते कामातील गंभीर अनियमितता उघड.....

DLP काळातही बिले उचलली; रस्ते कामातील गंभीर अनियमितता उघड…..

•आमदार संजय देरकर यांनी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्न सपाटून उचलला.

Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते कामांबाबत सुरू असलेल्या अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लागावेत यासाठी या वणी विधानसभा आमदार संजय देरकर सरसावले आहेत. तसेच अनेक लक्षवेधी सादर केलेले आहे

विशेषतः चारगाव चौकी ते कळमना या रस्त्याच्या कामांवर Defect Liability Period (DLP) लागू असतानाही संबंधित कंत्राटदारांनी बिले उचलल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यासोबतच गणेशपूर ते कायर या मार्गावर प्रत्यक्ष काम न करता कागदोपत्री काम पूर्ण दाखवून बिलांची उचल केल्याचा आरोप आमदार संजय देरकर यांनी केला .हा संपूर्ण प्रकार वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी विधिमंडळात अध्यक्षांसमोर लक्षवेधी प्रश्नाद्वारे मांडत सरकारचे लक्ष वेधले.

रस्त्यांची प्रत्यक्ष स्थिती आणि कागदोपत्री दाखवण्यात आलेली प्रगती यामध्ये मोठी तफावत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात ठामपणे मांडला.चारगाव चौकी ते कळमना या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची झीज, खड्डे, उखडलेले डांबर आणि निकृष्ट दर्जाचे काम स्पष्टपणे दिसून येते. या रस्त्याच्या बाबतीत DLP कालावधीत ठेकेदाराची जबाबदारी दुरुस्ती करण्याची असताना, दुरुस्ती न करता थेट देयके मंजूर करून घेण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन तर झालेच आहे, शिवाय सार्वजनिक निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्याचप्रमाणे गणेशपूर ते कायर या मार्गावरही कामे अपूर्ण अवस्थेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी वारंवार केली आहे. प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपेक्षित दर्जाचे नसताना, मोजमाप पुस्तिका आणि कागदोपत्री अहवालांच्या आधारे बिले कशी मंजूर झाली, असा सवाल आमदार देरकर यांनी उपस्थित केला.

विधिमंडळ सभागृहात बोलताना आमदार देरकर यांनी सांगितले की, रस्त्यांची अवस्था पाहता संबंधित विभाग, अभियंते आणि कंत्राटदार यांच्यात संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नाही. “काम न करता बिले उचलली जात असतील, तर हा केवळ दुर्लक्षाचा विषय नाही, तर थेट भ्रष्टाचाराचा प्रकार आहे,” असे मत त्यांनी स्पष्ट शब्दांत आमदार संजय देरकर यांनी मांडले.या अनियमिततेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रस्ते हे विकासाचे मुख्य दुवे असताना, अशा प्रकारे निधीचा गैरवापर झाल्यास विकासाच्या संकल्पनेलाच तडा जातो, म्हणून आम्हाला निधी नाही दिले तरी चालेल परंतु डी एल पी चे रस्ते हे नियमितपणे नागरिकांना सोयीस्कर काम आले पाहिजे हाच माझा मुख्य उद्देश राहील.या प्रकरणी संबंधित रस्ते कामांची तात्काळ चौकशी करावी, DLP नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि काम न करता उचललेली बिले परत घेण्यात यावीत, अशी ठोस मागणी आमदार देरकर यांनी सरकारकडे केली. विधिमंडळ सभागृह अध्यक्षांसमोर उपस्थित झालेल्या या लक्षवेधी प्रश्नामुळे सभागृहात काही काळ खळबळ उडाली.आता सरकार या गंभीर आरोपांवर कोणती भूमिका घेते, चौकशीचे आदेश दिले जातात की नाहीत, आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते की केवळ आश्वासनांपुरते प्रकरण मर्यादित राहते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.जनतेच्या पैशातून झालेले रस्ते काम आणि त्यातील अनियमितता यावर उत्तर देण्याची जबाबदारी आता सरकारवर आहे.

विधिमंडळ सभागृह अध्यक्षांसमोर हाच मांडलेले प्रश्न महामार्ग व मुख्य जिल्हा मार्ग रस्त्याची कालावधी संपण्याच्या अगोदरच रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनात.

1. रा.मा ३१९ ते वागदरा ते प्र.रा.मा-१४ ला जोडणारा रस्ता MDR – ६७ ,2. प्ररामा-१४ ते वणी, निळापूर, ब्राम्हणी, अहेरी, बोरगाव, उकणी, निलजई, ते जिल्हा सीमेपर्यंत MDR – ७३ २५.१०० कि.मी.,3.भालर, वेल्हाळा, उकणी रस्ता MDR ७४ .८,००० कि.मी.4. रामा-३१४ ते मोहूली, पेटूर, चारगाव, निवली MDR- ७५ ५,००० कि.मी. डिसें. – २०२६ 5. रामा-३१४ ते मोहूली, पेटूर, चारगाव, निवली MDR – ७५ ,२.२०० कि.मी.एप्रिल- २०२८,6. रामा-३१४ ते दहेगाव, साखरा, परसोडा, कायर, मॅढोली, शिरपूर ते रामा-३१७ ला जोडणारा रस्ता MDR-७६ ६.८०० कि.मी. मे-२०२७,7. कोरंबी, सुकनेगाव, मेंढोली, वेळाबाई रस्ता MDR- ৩৩ १.५०० कि.मी.जून- २०२८ ४.प्ररामा- १४ ते मंदर पेटूर रस्ता MDR – ७८१.००० कि.मी,9. कुरई, शिंदोला, साखरा ते जिल्हा सीमेपर्यंत रस्ता MDR-७९ ८,००० कि. मी.,10. कुरई, शिंदोला, साखरा ते जिल्हा सीमेपर्यंत रस्ता MDR- ७९ ४.००० कि.मी,11. कुरई, शिंदोला, साखरा ते जिल्हा सीमेपर्यंत रस्ता MDR – ७९,२.०३० कि.मी.1. करंजी, मारेगाव, वणी, घुग्गूस रस्ता 2. पारवा, कारेगाव, पिंपळखुटी, पिंप्री, सतपल्ली, मुकुटबन, नेरड, मोहदा, वेळाबाई तांडा रस्ता रामा -३१५ ४,८०० कि.मी.3. पारवा, कारेगाव, पिंपळखुटी, पिंप्री, सतपल्ली, मुकुटबन, नेरड, मोहदा, वेळावाई तांडा रस्ता रामा-३१५ ८.४०० कि.मी.३०/०५/२०२७ ,4. पारवा, कारेगाव, पिंपळखुटी, पित्री, सतपल्ली, मुकुटबन, नेरड, मोहदा, वेळाबाई तांडा रस्ता रामा-३१५ ४.३०० कि.मी,5. सांगली, सातेफळ, नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, खडकी, माडी-वणी, चारगाव, कुरा, अंतरगाव, चांदूर, देवाळा रस्ता रामा- ३१७ ८.१०० कि.मी. ३०/०३/२०२७,6.सांगली, सातेफळ, नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, खडकी, माडर्डी-वणी, चारगाव, कुरा, अंतरगाव, चांदूर, देवाळा रस्ता रामा- ३१७ ४,४०० कि.मी,7. सांगली, सातेफळ, नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, खडकी, माडर्डी-वणी, चारगाव, कुरा, अंतरगाव, चांदूर, देवाळा रस्ता ,रामा- ३१७,११.५०० कि.मी.8. वणी, पुरड, नेरड रस्ता रामा- ३१९ २.७०० कि.मी,9. वणी, पुरड, नेरड रस्ता रामा- ३१९,२०,८०० कि.मी.३०/०४/२०२७,10. कुली, कुरई, ढाकोरी, कोळशी, कोरपना रस्ता रामा-३७४ ३,००० कि.मी.मे- २०२७,11. कुर्ली. कुरई, ढाकोरी, कोळशी, कोरपना रस्ता रामा-३७४ ३,००० कि.मी ,मे-२०२७,12. कुली, कुरई, ढाकोरी, कोळशी, कोरपना रस्ता रामा-३७५३.२०० कि.मी.२४/०५/२०२७….

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page