अजय कंडेवार,Wani :- १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मुख्य मागणीसाठी शासकीय निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थश्रेणी कर्मचारी समन्वय समितीतर्फे तहसिल कार्यालयावर शनिवारी ‘डफडे बजाव “मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वणी विधानसभेतील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
देशातील सहा राज्य सरकारांनी एनपीएस ही योजना बंद करून त्याठिकाणी जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत प्रगत व पुरोगामी राज्य आहे. तरीही या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. त्यामुळे राज्यभरातील १९ लाख कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करत आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मूळ मागणीला बगल देण्यासाठी एनपीएसमध्ये सुधारणा करून जीपीएस योजना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही योजना कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्याने सदर योजना लागू करू नये, जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मुख्य मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी वणी तहसिल कार्यालयावर धडक दिली. डफडे बजाव मोर्चा मार्ग तहसील कार्यालय ते टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, टागोर चौक ते शिवाजी पुतळा वापस तहसील येथे कार्यालयापर्यंत कर्मचाऱ्यांनी पायी मोर्चा काढला. तसेच तहसिल कार्यालयाचा परीसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. नवीन पेन्शन योजनांमुळे कर्मचाऱ्यांचे कसे हाल होणार आहेत, ही बाब पटवून देण्यात आली.यापुढे वोट फॉर ओ पी एस अधिक जोमाने राबविण्यात येईल असा कर्मचानी निर्धार केला. डफडे मोर्चा आंदोलनामध्ये अनेक जुन्या नव्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी या मोर्चाला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,संजय खाडे ,किरण देरकर ,टीकाराम कोंगरे यांनी संबोधित केले तसेच संजय दरेकर,डॉ. महेंद्र लोढा, नदीम पटेल, मिलिंद सोळंके ,शैलेश राऊत, रवी बावनगडे, प्रवीण बहादे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.रवी चांदणे,विलास टोंगे , वणी ,मारेगाव व झरी तालुक्यातील सर्व संघटना पदाधिकारी व सर्व नवे जुने कर्मचारी यांनी डफडे बजाव आंदोलन यशस्वी करण्यासाठी पथक परिश्रम घेतले.