Tuesday, October 14, 2025
HomeBreaking Newsअखेर...... पणन महासंघ संचालक संजय खाडे यांच्या मागणीला यश.....!

अखेर…… पणन महासंघ संचालक संजय खाडे यांच्या मागणीला यश…..!

•मारेगाव येथे CCI कापूस खरेदीं "या "तारखेला सूरू. •शेतकऱ्यांना दिलासा,

Ajay Kandewar :– मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य पीक असून शेतकऱ्यांना कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने, सीसीआय कापूस खरेदी केंद्र मारेगांव येथे तत्काळ सुरु करण्यात यावे अशा आशयाचे पत्र म.राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ संचालक संजय खाडे यांनी भारतीय कापूस निगम लि.यांना अनेकदा दिलें. Finally…… Sanjay Khade, Director of Marketing Federation, succeeds in his demand.

मारेगांव तालूका हा कापूस उत्पादक तालूका म्हणून प्रसिद्ध आहे. कपाशी पीकावरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित असले तरी वाढती महागाई पाहता कापसाला अपेक्षित बाजार भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येणे सुरु झाले मात्र तालुक्यामध्ये खाजगी कापूस खरेदी सुरु असल्याने भावामध्ये तफावत असून शेतकऱ्यांची लुट होत आहे. अगोदरच नापीकीने व कमी भाव असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मारेगाव तालुक्यात सीसीआय खरेदी केंद्र नसल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी वणीला जावे लागते,त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो.मारेगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो त्यामुळं म.राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ संचालक संजय खाडे यांनी भारतीय कापूस निगम लि.यांना अनेकदा कागदोपत्री पाठपुरावा केले.त्यात त्यांना यश ही प्राप्त झाले.आणि सीसीआय कापूस खरेदी केंद्राला 18 डिसेंबर पासून ऑनलाइन अर्ज करता येईल तर खरेदी शुभारंभ हे 20 डिसेंबर पासून होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधे समाधानाचे वातावरण दिसत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments