Ajay Kandewar,वणी: शहरातील चिखलगाव ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या सदाशिव नगरचा एक चिमुरडा सायकलने आवारात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला असून, ताे गंभीर जखमी झाला आहे. श्रिजित श्रीकांत कालर (९) रा.वणी, जि.यवतमाळ असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
श्रीकांतवर श्वानाने हल्ला केला असून, त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर खाेल व कानाला जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. मागच्याच आठवड्यात शहरात अनेकांवर भटक्या श्वानाने हल्ला चढवला हाेता. त्यातही जखमी झाले हाेती.त्यामुळे वणी परिसरात माेठ्या प्रमाणात वाढलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या व शहरात नगरपरिषद हद्दीत हाेत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे संबंधित विभागाकडून होणारा कानाडोळा वणीकरांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. चिखलगाव ग्राम प्रशासनाने व वणी शहरांतील नगरप्रशासनानं भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने आणि गांभीर्याने या समस्येकडे पाहणे आवश्यक आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व नियंत्रण पथकांमार्फत होणारी कारवाई परिणामकारक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
“श्वानांची दहशत दिवसेंदिवस जीवघेणी ठरत असताना ग्राम प्रशासन व नगर प्रशासन मूग गिळून गप्प का? भटक्या श्वानांचा बंदोबस्त कधी करणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून, श्वानांची झुंड दिसली तरी मनात धडकी भरते.” – अनिल उत्तरवार
” वणी शहरातील नगर प्रशासनाला अनेकदा जनतेने निवेदने दिली ,अनेक घटना घडल्या तरीही अनेक घटना घडतच आहे…यावर वणी नगरपरिषद c.o यांनी चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या घटनेचा सार घेऊन शहरात कुत्रे आवरण्याची मोहीम राबविली पाहिजे “