Tuesday, May 12, 2026
HomeएडवोटोरियलN.B.S.A आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू.......

N.B.S.A आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू…….

Ajay Kandewar,Wani:-वणी शहरातील शिक्षण क्षेत्रात विश्वासार्ह नाव बनलेल्या एन.बी.एस.ए. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वणी यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्न या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध पदवी व कौशल्याधारित अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कॉलेज प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन बी.ए., बी.कॉम. सोबतच Cashier, Tally, DTP यांसारखे व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी स्कॉलरशिप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुभवी प्राध्यापकवर्ग, विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती, शिस्तबद्ध वातावरण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे एन.बी.एस.ए. कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे.“शिक्षणासोबत कौशल्य विकास” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असून, वणी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय एक विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे येत आहे.प्रवेशासाठी संपर्क :नगर परिषद शाळा क्र. ७ जवळ, अहमद ले-आऊट, विठ्ठलवाडी, वणी मो. नं. : ७४९८२००४७५.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page