अजय कंडेवार,Wani:- अबॅकस लेव्हल- २ च्या २०२४ मध्ये विद्यार्थ्यांसाठी झालेल्या स्पर्धेत वणी तालुक्यातील अन्वय विजय नगराळे या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला.
गणित हा विषय कठीण असल्याने तो लहानपणापासून सोपा जावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी हा विषय अबॅकसच्या साह्याने वेगळ्या पध्दतीने शिकवता येतो. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राहणारा व अल्फोर्स येथे शिक्षण घेत असलेल्या अन्वय नगराळे या विद्यार्थ्यांने अबॅकसच्या या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत राज्यभरात प्रथम क्रमांकाने यशस्वी झाला.ही स्पर्धा दि २० ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 100 अँकॅडमीचा विद्यार्थांनी परीक्षेला सहभाग घेतला होता. या स्पर्धत वणी येथील जिनियस चॅम्स अकॅडमीचा विद्यार्थी अन्वय विजय नगराळे याने संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला.अन्वय हा येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ संचिता नगराळे व (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे यांच्या मुलगा आहे . या यशामागे अमरीन अहमह यांच्या मोलाचा वाटा आहे.अन्वय शाळेत देखील अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. अन्वय च्या या यशाचे कौतुक संपूर्ण वणी तालुक्यात होत आहे.

