Saturday, November 21, 2026
HomeBreakingसहा वर्षीय चिमुकल्याचा जीव जाऊन ३१ दिवस; राजकीय झेंडे मात्र गायब.....

सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव जाऊन ३१ दिवस; राजकीय झेंडे मात्र गायब…..

Ajay Kandewar,Wani : मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीत 21 ऑक्टोबर रोजी एका सहा वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होऊन तब्बल ३१ दिवसांचा कालावधी उलटला. नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमस्थळावरून बेपत्ता झालेल्या या चिमुकल्याचा दुसऱ्या दिवशी कुंभा गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील गदाची बोरी जवळ असलेले पाण्यात मृतदेह आढळला होता. मृतदेहापासून दूर पँट आढळल्याची बाबही या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारी ठरली. मात्र महिनाभराहून अधिक काळ लोटूनही मृत्यूचे गूढ उकललेले नाही आणि आरोपीचा शोधही लागलेला नाही. LCB यंत्रणेच्या तपासावर सातत्याने चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळातील पोळी शेकणारी शांतताही आता विशेष चर्चेचा विषय बनली आहे.

शहरातील अवैध धंदे, अवैध वाहतूक आणि अन्य बाबींवर निवेदने देण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने पुढे येतात. पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चे, निवेदने, प्रसिद्धी आणि राजकीय शक्तिप्रदर्शनाची चढाओढही पाहायला मिळते. मात्र एका सहा वर्षीय निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा ठळकपणे पुढे आलेला दिसत नाही. ना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठोस पुढाकार, ना तपासाला गती देण्यासाठी आंदोलन, ना पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची राजकीय तत्परता. अवैध धंद्यांसाठी जागे होणारे राजकीय नेतृत्व सामान्य नागरिकांच्या गंभीर प्रश्नांवर मात्र मौन बाळगून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजकारण केवळ निवेदनबाजी, स्टंटबाजी ,प्रसिद्धी आणि पोलिसांवरील दबावापुरते मर्यादित राहू नये. सामान्य माणसाच्या वेदनेत सहभागी होणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे हीदेखील राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. केवळ निवडणुकीपूर्ता मतदारांना भेटण्याचा स्टंट नको अशी सुद्धा नागरिकांची चर्चा आहे.एका चिमुकल्याचा जीव गेला, ३१ दिवस उलटले, आरोपी मिळाला नाही आणि राजकीय झेंडेही मैदानात उतरले नाहीत, ही केवळ राजकीय उदासीनता नसून सामाजिक संवेदनशीलतेचीही शोकांतिका ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page