Tuesday, November 3, 2026
HomeBreakingचिखलगावात कोळसा प्लॉट हटविण्याच्या संघर्षातच "उभी फूट....?"

चिखलगावात कोळसा प्लॉट हटविण्याच्या संघर्षातच “उभी फूट….?”

Ajay,Wani:- चिखलगाव येथील लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉट हटविण्यासाठी सुरू झालेला संघर्ष आता कोळसा प्लॉटपेक्षा अंतर्गत गटबाजीमुळे अधिक चर्चेत आला आहे. चिखलगाव आणि मेघदूत कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत प्रदूषणाविरोधात संघर्ष समिती स्थापन केली; मात्र काही काळातच या एकजुटीला तडा जाऊन गावातच दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला पंकज मोरे यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू ग्रामपंचायत सदस्यांसह आठ जणांनी स्वतंत्र भूमिका घेत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले, तर दुसरीकडे लालपुलिया संघर्ष समितीच्या नावाने दुसरा गट तारखा बदलू बदलू आंदोलनाची तयारी करीत आहे. नऊ विरुद्ध आठ अशा विभागणीची चर्चा सुरू असताना एकाच गावातील नागरिक दोन गटात विभागले जाणे, ही कोळसा प्लॉटविरोधातील आंदोलनासाठी निश्चितच धक्कादायक बाब मानली जात आहे.

दरम्यान, पंकज मोरे व त्यांच्यासोबतच्या आठ जणांनी २९ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जवळपास दोन महिने उलटूनही लालपुलिया कोळसा प्लॉट हटविण्याची प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही, प्रदूषणाचा त्रास कायम आहे आणि प्रशासनाचे निर्देश प्रत्यक्षात उतरलेले नाहीत, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे केवळ आंदोलनाच्या घोषणा न देता निवेदन, प्रशासकीय पाठपुरावा आणि कारवाईसाठी थेट अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा मार्ग या गटाने स्वीकारल्याचे दिसते. दुसरीकडे संघर्ष समितीने यापूर्वी “दोनदा” आंदोलनाच्या तारखा बदलल्यानंतर आता ५ तारखेला आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, यावेळी आंदोलनात गावातील आठ ग्रामपंचायत सदस्य सहभागी होणार का, की संघर्ष समितीला स्वतंत्रपणेच मैदान गाठावे लागणार, हा खरा प्रश्न आहे. आंदोलनाची तारीख जवळ येत असताना गावातील “उभी फूट” मात्र अधिक sensitive होत आहे. आणि होणाऱ्या आंदोलनाला ही बाब घातक ठरणार असल्याची ही बोंब गावात सुरू आहे.

संघर्ष चुलित मात्र गट दोन….एकजुटीचेच दोन तुकडे झाल्याचे चित्र……

“कोळसा प्लॉट हटविण्यासाठी स्थापन झालेल्या संघर्षातच गावकऱ्यांची उभी फूट पडणे, यापेक्षा दुर्दैवी चित्र कोणते? पण अशी वेळ येण्यामागे आणखी कोणता कारण होता का? एका बाजूला पंकज मोरे गटासह गावकऱ्यांनी निवेदनातून प्रशासनाला थेट जाब विचारत कारवाईचा मुद्दा पुढे आणला आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनाच्या “तारखा बदलत” तिसऱ्या तारखेत ५ नोव्हेंबर रोजीचा तारखेचा निर्धार जाहीर झाला आहे. आता प्रश्न केवळ आंदोलन होणार की नाही, एवढाच नाही; तर या आंदोलनाला गावातील किती लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची साथ मिळणार, हाही आहे. कोळसा प्लॉट हटविण्याची ताकद एकजुटीत होती; मात्र आज गावातच “दोन गट”उभे राहिले आहेत. त्यामुळे ५ तारखेचे आंदोलन कोळसा प्लॉटविरोधातील निर्णायक लढा ठरणार की संघर्ष समितीच्या एकाकी आणि चुकीचा निर्णयाचा बळी पडणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.कोळसा प्लॉट हटविण्याचा संघर्ष आता गटबाजीच्या वळणावर पोहोचला आहे. प्लॉट हटविण्यासाठी एकजूट झाली होती; मात्र आता त्या एकजुटीचेच दोन तुकडे झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे.कोळसा प्लॉट हटविण्याचा संघर्ष खऱ्या अर्थाने सुरू आहे की संघर्षाच्या नावाखाली नेतृत्वाचीच वेगळी लढाई रंगत आहे. आता या आंदोलनाला वेगळा अर्थ लागला असं गांवकरी चर्चा ऐकू येत आहे 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page