VidarbhNews,Wani :- समाजात अनेक चेहरे दिसतात; मात्र प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून जाणारी माणसं फार कमी असतात. अशाच माणुसकीचा वारसा जपणारे, प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणारे आणि कोणत्याही व्यक्तीवर संकट ओढवल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे युवा व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोज वाकटी.केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे आणि अडचणीच्या प्रसंगी कोणताही भेदभाव न करता माणुसकीच्या नात्याने धावून जाणे, ही त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या स्वभावातील आपुलकी, मनमिळाऊपणा आणि मदतीची वृत्ती यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण केले आहे.
यवतमाळ जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष…..
सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची त्यांची वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, समाजाच्या अडचणी समजून घेणे आणि गरज पडल्यास लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक पैलू आहे. पदापेक्षा माणसं आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देणारा हा युवा चेहरा भविष्यातही सामाजिक कार्याच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे. अशा या मनमिळाऊ, दिलदार आणि समाजाशी नाळ जोडलेल्या मनोज वाकटी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

