Tuesday, November 3, 2026
HomeBreakingकोळसा प्लॉटचे चित्र बदलले नाही; मात्र समितीच्या आंदोलनाच्या तारखा दोनदा बदलल्या.......

कोळसा प्लॉटचे चित्र बदलले नाही; मात्र समितीच्या आंदोलनाच्या तारखा दोनदा बदलल्या…….

Ajay,Wani : जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशानंतर लालपूलिया कोळसा प्लॉट बंद होणार, या अपेक्षेने समितीने एकजुटीने सुपर्ब  जल्लोष  केला होता. मात्र, या घोषणेला तब्बल महिनाभराचा कालावधी लोटूनही हातात निराशा झाली.लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉटचे चित्र काही बदललेले नाही. कोळशाची उलाढाल सुरूच आहे आणि प्रदूषणाचा प्रश्नही कायम आहे. विशेष म्हणजे, या महिनाभरात कोळसा प्लॉटचे चित्र बदलले नसले, तरी लालपुलीया संघर्ष समितीच्या आंदोलनाची तारीख मात्र दोनदा नक्कीच बदलले.

सुरुवातीला २७ तारखेला आंदोलनाचा एल्गार, त्यानंतर २ तारखेची घोषणा आणि आता अखेर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वाय पॉइंटवर चक्काजाम आंदोलनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. दोनदा तारखा बदलून पुन्हा नव्याने तारीख निश्चित करण्याची वेळ समितीवर का आली, ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख निश्चित केलेली होती परंतु दोनदा तारीख बदलल्यानंतरही कोणतेही अधिकृत माहिती 2 तारखेची आणि 27 तारखेची अधिकृत देण्यात आलेली नाही अशी माहिती आहे आणि विशेष म्हणजे दिवाळीच्या अगदी तोंडावरच आंदोलनाची तारीख निश्चित करण्यामागचे गणित काय? याबाबत आता नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.एकीकडे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे आंदोलनाच्या तारखांमध्ये होणारे बदल नागरिकांचा संभ्रम वाढवणारे ठरत आहेत. निवेदन देणे, पुरावे सादर करणे आणि आंदोलनाच्या घोषणा करणे या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या आंदोलनाची अंमलबजावणी आणि त्यातून मिळणारा परिणाम होय.

आता ५ नोव्हेंबरला होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या वेळी तरी आंदोलन प्रत्यक्षात होते का? त्याला किती जनसमर्थन मिळते? की पुन्हा एकदा तारीख बदलण्याची वेळ येते? हे लवकरच स्पष्ट होईल.कारण लालपुलियातील कोळसा प्लॉटचे चित्र बदलण्यासाठी संघर्ष हवा; आंदोलनाच्या तारखांचे कॅलेंडर बदलून प्रदूषण कमी होणार नाही. अशी जनमानसातून बोलल्या जात आहे. आता समितीने कंबर कसली आहे पण किती?

येत्या 5 नोव्हेंबर तारखेला “रस्ता रोको” आमची लालपुलिया संघर्ष समिती करणार आहे. आता कोणतीही तारीख बदलणार नाही. परिसरातील त्रस्त नागरिकांनी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे – प्रदीप खेकारे (सचिव,लालपुलिया संघर्ष समिती)

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page