Ajay,Wani:- लालपुलिया येथील कोळसा प्लॉट हटविण्याच्या मागणीवरून अनेक निवेदने, आंदोलनाचे ‘इशारे ‘ आणि ‘संघर्षाची सुपर्ब तयारी’ झाल्याचे चित्र वेळोवेळी समोर आले. मात्र प्रत्यक्ष आंदोलनाची वेळ आली की पुन्हा नवी तारीख, “नवा इशारा” आणि “पुन्हा प्रतीक्षाच Game”. त्यामुळे या संपूर्ण संघर्षाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. कोळसा प्लॉट हटविण्याची मागणी खरोखरच निर्णायक टप्प्यावर नेण्याचा निर्धार आहे की केवळ निवेदनांच्या आणि आंदोलनाच्या घोषणांचाच खेळ सुरू आहे. संघर्षाच्या नावाखाली वारंवार ‘ती तारीख’ पुढे ढकलण्यामागचे नेमके कारण काय, याचे उत्तर अद्याप जनतेसमोर आलेले नाही.
विशेष म्हणजे, या विलंबामागे काही वेगळे “गणित” तर नाही ना? पडद्यामागे काही ‘सेटिंग’ झाली आहे का? की wish पूर्ण होत नसल्याने ‘संघर्ष दिशा’ वारंवार बदलत आहे,असे सवाल आता परिसरात चर्चिले जात आहेत. काहींच्या मते, संघर्षाचा आवाज बुलंद आहे; मात्र कृतीच्या वेळी पावले मागे का पडतात, हा खरा प्रश्न आहे. मात्र काहीं आंदोलनाच्या प्रत्येक “नव्या तारखेसोबत” “गोड बोलू मधमाशी” सारखी संशयाचे ढग अधिक गडद होत आहेत. त्यामुळे गोडबंगाल करणाऱ्यांनी आता जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अन्यथा ‘लालपुलियाचा संघर्ष’ आहे की ‘तारीख पे तारीख’चा अनुत्तरित गौडबंगाल, असा प्रश्न उपस्थित होत राहणार.

