Saturday, October 31, 2026
HomeCityवणीत बळीराजा व्याख्यानमालेला प्रशांत गावंडे संबोधित करणार .....

वणीत बळीराजा व्याख्यानमालेला प्रशांत गावंडे संबोधित करणार …..

Ajay ,Wani:- वणी च्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे काही मोजके उपक्रम शहरात होत असतात. त्यातीलच एक म्हणजे ” बळीराजा व्याख्यानमाला ” ! शिव महोत्सव समिती च्या बॅनरखाली ही व्याख्यानमाला या वर्षी 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेम्बरला दरवर्षीप्रमाणे बाजोरिया लॉन येथे सायं 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या विचाराचे कृतीशिल अभ्यासक, अकोला येथील गांधी संशोधन केंद्राचे कार्यकारी विश्वस्त व शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे हे दोन दिवसीय व्याख्यानमालेस संबोधित करतील.

ज्योती पुनवटकर व अमृतराव घागे यांच्या स्मृतिस समर्पित या व्याख्यानमालेत अनुक्रमे ” गांधी : एक चेतना ” आणि ” स्वतंत्र भारताचा इतिहास ” या विषयावर गावंडे भाष्य करतील. ग्रामीण पार्श्वभुमी लाभलेल्या वणी सारख्या तालुक्याच्या व लहान शहरात श्रोत्यांची संख्या आणि गुणवत्तेच्या स्तरावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रबोधनाची व्याख्यानमाला अशी ओळख आता या व्याख्यानमालेची झाली आहे. 2015 पासून प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेचे हे सलग 12 वे वर्ष असुन, एवढा कालखंड निश्चीतच कौतुकास्पद आहे.

विषयाचे वैविध्य, वास्तव – परखड भाष्यकार आणि विनाकारण चे उपचार टाळून श्रोत्यांना फक्त ” व्याख्यानाचा आनंद ” देणारी ही व्याख्यानमालिका म्हणूनच चर्चेत असते – आहे.  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुजाण श्रोते आणि नागरिकांनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे.असे आवाहन शिव महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष अनंत मांडवकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.करमसिंग राजपुत, निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी केले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page