Wednesday, October 14, 2026
HomeUncategorizedसेनेचा "ढाण्या वाघ अजिंक्य शेंडे" यांची पाचव्यांदा युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी निवड.....

सेनेचा “ढाण्या वाघ अजिंक्य शेंडे” यांची पाचव्यांदा युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी निवड…..

Ajay,Wani : वणी विधानसभेत पदापेक्षा पक्षनिष्ठा आणि विचारांशी असलेली बांधिलकी महत्त्वाची मानणारे कट्टर शिवसैनिक म्हणून अजिंक्य शेंडे यांची स्वतंत्र ओळख आहे. युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी त्यांची पाचव्यांदा निवड झाल्याने त्यांच्या संघटनात्मक वाटचालीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी नाळ जोडून ठेवत, धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्याची भूमिका त्यांनी वणी विधानसभेत सातत्याने मांडली आहे.

शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष प्रवेश सरनाईक यांच्या आदेशानुसार अजिंक्य शेंडे यांची नियुक्ती यवतमाळ उपजिल्हाप्रमुख पदी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने, युवासेना राज्य सचिव शुभम नवले आणि युवासेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पाचव्यांदा मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, संघटनेतील विश्वास आणि सातत्य अधोरेखित करणारी ठरली आहे.

अजिंक्य शेंडे यांची ओळख कोणाच्या पाठबळावर नव्हे, तर स्वतःच्या भूमिकेवर……

वणी विधानसभा क्षेत्रात या वाघ्या अजिंक्य शेंडे यांची ओळख कोणाच्या पाठबळावर नव्हे, तर स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या शिवसैनिकाची आहे. समर्थकांच्या भाषेत सांगायचे तर, ‘सेनेचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळख असलेले शेंडे युवकांचे प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करतात. नव्या नियुक्तीनंतर युवकांना संघटनेशी जोडणे, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार करणे, ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. पाचव्यांदा मिळालेल्या संधीचे रूपांतर प्रत्यक्ष संघटनात्मक कामात हा वाघ्या कुणाचा दबावात असणार की स्वतः वणी विधानसभेचा जंगलात एकटा डरकाळी फोडणार याकडे सेनेचा अनेकांचे लक्ष लागले आहे. विशेषता हे पद UBT गटाला स्वेच्छने रामराम केल्यानंतर जवळपास 8 महिन्यानंतर हा पद मिळाल आहे. कारण यामध्ये एकच की बाळासाहेबांची सेना म्हणजेच अजिंक्याचा धमण्यातील वाहणार सळसळत रक्त.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page