Ajay,Wani : वणी तालुक्यातील राशन कार्डधारकांची KYC प्रक्रिया मोफत असताना त्यासाठी २० रुपये मागितलेच कसे? असा संतप्त सवाल आता वणी विधानसभा क्षेत्रातून उपस्थित होत आहे. एका समूहावर राशन वितरणाचा परवाना असलेल्या वणी शहरातील “त्या गेंडूरगिटक्या” राशन दुकानदाराकडून KYCच्या नावाखाली २० रुपयांची अधिकृतपणे समूहावर मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या मोफत प्रक्रियेच्या नावाखाली संबंधित दुकानदाराने असा शुल्क आकारण्याचा अधिकार नेमका कुठून मिळवला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. गरिबांच्या राशनवर ज्याचा परवाना चालतो, त्याच्याकडून KYCच्या नावाखाली “अतिरिक्त वसुलीचे धाडस होत असेल तर हा प्रकार माफ करण्यासारखा नाही, या गेंडूरगिटक्या राशन दुकानदाराच परवाना रद्द झालाच पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे, KYC मोफत असल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले असताना २० रुपयांची मागणी करण्याची गरजच काय होती? हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर प्रश्न आहे. आज KYCच्या नावाखाली प्रत्येकी २० रुपये मागितले जात असतील, तर उद्या इतर कोणत्या कारणासाठी पैसे मागितले असेलच त्या no doubt…असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ चौकशी करून थांबू नये; संबंधित दुकानदाराचा राशन वितरणाचा परवाना रद्द करा अशी मागणी युवा हुंकार संघटनेचे संस्थापक अजिंक्य शेंडे यांनी केली आहे.
वणी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कोणत्याही राशन दुकानात KYCच्या नावाखाली पैसे मागितले जात असतील तर नागरिकांनी शांत बसू नये, मात्र स्वतःहून वाद किंवा मारामारी न करता संबंधित दुकानदाराचे नाव, दुकानाची माहिती आणि शक्य असल्यास पुरावे घेऊन 8554036501,9096358002 या क्रमांकावर तक्रार करावी. मोफत KYCच्या नावाखाली २० रुपयांची मागणी करणाऱ्याला संरक्षण कशासाठी? असा थेट सवालही आता वणी पुरवठा विभागासमोर ठेवण्यात आला आहे. यात पुरवठा विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. त्यातच युवा हुंकार संघटनेचे संस्थापक अजिंक्य शेंडे हे समोरील कोणते भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

