Thursday, June 4, 2026
HomeBreakingACB ट्रॅप" मधील रणधीर आता वणी ट्रॅफिकचे "BOSS"....

ACB ट्रॅप” मधील रणधीर आता वणी ट्रॅफिकचे “BOSS”….

Ajay Kandewar,Wani:-शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार नरेश रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची घटना राज्यभर गाजली होती. ठाणेदारांच्या दालनातच रचलेला सापळा यशस्वी ठरला होता. विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्याने लहान मुलाला कडेवर घेऊन केलेल्या या धाडसी कारवाईची त्या काळात मोठी चर्चा झाली होती.आता त्याच नरेश रणधीर यांची वणी वाहतूक शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने वेगळच समोर येत आहे.

पोलीस उपनिरीक्षक (API) महाले यांच्या जागी रणधीर यांनी सूत्रे हाती घेतली असून, शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची वर्दळ, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी यावर त्यांचा नेमका काय प्रभाव पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वणीमध्ये वादग्रस्त ठाणेदार आता वाहतूक शिस्तीचे प्रमुख झाले आहे.” शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार की पुन्हा वाद निर्माण होणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. मात्र एवढे निश्चित की, रणधीर यांच्या नियुक्तीने वणीच्या पोलिसांत आणि राजकीय गल्लीबोळात नवाच विषय निर्माण झाला .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page