Saturday, May 2, 2026
HomeBreakingस्वतःवर 420 चे गुन्हे, आणि इतरांवर बोट ?

स्वतःवर 420 चे गुन्हे, आणि इतरांवर बोट ?

Ajay Kandewar,Wani:- माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून एका संघटनेबाबत उघड झालेल्या माहितीनंतर वणी शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आरटीआयमधून समोर आलेल्या कागदपत्रांनुसार राकेश खुराना यांच्याशी संबंधित संघटनेची अधिकृत नोंदणी किंवा वैध कागदपत्रे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती रविंद्र येरणे या व्यक्तीने माहिती अधिकारातून मिळवून सार्वजनिक केली आहे.

मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. कारण ही माहिती उघड करणारा रविंद्र येरणे स्वतः अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार येरणेवर ठगी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असून भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाचेही अनेक आरोप असल्याचे सांगितले जात आहे.यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की स्वतःवर गंभीर गुन्ह्यांची छाया असलेली व्यक्ती इतरांविषयी माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागत आहे, हे खरोखर जनहितासाठी आहे की एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्याचा कट आहे?

माहिती अधिकार कायदा 2005 हा शासनातील पारदर्शकतेसाठी आहे, मात्र त्याचा वापर वैयक्तिक सूड, दबाव किंवा बदनामीसाठी केला गेला तर तो कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारा प्रकार ठरतो.दरम्यान वणी शहरात आता चर्चेला उधाण आले असून “ज्याच्यावर स्वतःच फसवणुकीचे आरोप आहेत, तोच इतरांवर बोट दाखवत आहे”, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. त्यामुळे RTI च्या आडून नेमका कोणता डाव रचला जात आहे? असा सवालही उपस्थित होत आहे.

दम असेल तर…..कायदेशीर उत्तर देण्यास मी पूर्णपणे तयार- राकेश खुराणा.

युवा क्रांती संघटना नोंदणीकृत नसली तरी समाजासाठी प्रामाणिकपणे आरोग्य शिबिरे, आय कॅम्प, कोरोना काळात मदतकार्य, शेकडो ई-श्रमिक कार्ड आणि शैक्षणिक उपक्रम असे अनेक निःशुल्क कामे केली आहेत. स्वतः 420 प्रकरणात अडकलेले लोक बदनामीचे षडयंत्र रचत असतील, तर त्यांनी थेट कायद्याचा मार्ग स्वीकारावा.माहितीचा गैरवापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला कायदेशीर उत्तर देण्यास मी पूर्णपणे तयार आहे.— राकेश खुराणा

 

हाच तो मुद्दा रविंद्र येरनेने घेतलेला…… खरच “युवा क्रांती” ची नोंद आहे की नाही?

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page