Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsशिंदे सेनेचा ‘विजयी’ दबदबा, विरोधकांना ठरला घामाघूम दिवस....!

शिंदे सेनेचा ‘विजयी’ दबदबा, विरोधकांना ठरला घामाघूम दिवस….!

शिंदे सेनेचा ‘विजयी’ दबदबा, विरोधकांना ठरला घामाघूम दिवस....!

Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शिंदे सेनेने काढलेली भव्य रॅली शहरभरात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. हजारो महिला, युवक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वणी काही काळ ठप्पच झाल्यासारखे चित्र पाहायला मिळाले.

जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीने शिंदे सेनेची संघटनशक्ती, जनसंपर्क आणि प्रभावी जनआधार याचे दमदार प्रदर्शन घडवले. विशेष म्हणजे, शेवटच्या क्षणी घेतलेल्या या रॅलीला मिळालेला महिला वर्गाचा तुफानी प्रतिसाद विरोधकांच्या गोटात चांगलीच खळबळ उडवणारा ठरला आहे.महिलांचा उत्साह, घोषणांचा गजर आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन यामुळे शिंदे सेनेला मिळत असलेला पाठिंबा प्रत्येक प्रभागात स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. अनेक नागरिकांच्या मते, “वणीत लाडक्या बहिणीने शिंदे सेनेला दिलेली साथ” हे चित्र विरोधकांसाठी निश्चितच धोक्याची घंटा ठरत आहे.

रॅलीदरम्यान उमटलेल्या प्रचंड गर्दीमुळे विरोधकांच्या प्रचारयंत्रणेत तणाव वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. “ही रॅली पाहिल्यानंतर विरोधकांना घाम फुटला आहे”, अशी चर्चा शहरभर जोरात रंगली आहे.नगरपरिषदेत शिंदे सेनेचा झेंडा रोवण्याची तयारी आता अधिक ठळकपणे जाणवू लागली असून, रॅलीनंतर शिंदे सेनेचे मनोबल प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे.वणीतली ही महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने भारलेली शक्ती–रॅली निवडणुकीच्या वातावरणात एक निर्णायक टप्पा ठरू शकते, इतकेच नव्हे तर विरोधकांच्या संपूर्ण गणितालाच धक्का देणारी ठरल्याची चर्चाही वणित जोमाने सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page