Ajay Kandewar,Wani : प्रभाग क्रमांक ५ मध्ये वातावरण तापले असून प्रशांत उर्फ छोटू भाऊ यांच्या दमदार जनसंपर्काचा थेट फायदा त्यांच्या अर्धांगिनी सोनाली प्रशांत (छोटू) निमकर यांना मिळताना दिसत आहे. छोटू भाऊ यांनी वर्षानुवर्षे लोकांशी जुळवलेली माणसांची नाड, विश्वासाची नाळ आणि संकटात धावून जाण्याची ओळख—हेच आज सोनालीताईंच्या प्रचारात ‘जबरदस्त लाट’ बनत आहे.
घराघरांतून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग ५ मध्ये सोनालीताईंची जोरदार पकड निर्माण झाली असून नागरिक स्पष्टपणे म्हणत आहेत”छोटू भाऊंचं काम पाहिलंय…आता ताईंसोबत उभं राहणं आमचं कर्तव्य!” प्रचारसभांपासून ते घरपोच भेटींमध्ये सोनालीताईंना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, प्रभाग ५ चे चित्र एकतर्फी होत चालल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.एकूणच, छोटू भाऊंच्या लोकाभिमुख कामांचा विश्वास आणि सोनालीताईंचा नम्र, जमिनीवरचा स्वभाव प्रभाग ५ मध्ये “निमकर” नावाची मजबूत लाट निर्माण करत आहे.

