Ajay Kandewar, Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात मोठी राजकीय हालचाल सुरु झाली असून, वणीतील लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २६ नोव्हेंबर रोजी वणी दौऱ्यावर येत आहेत. ही सभा वणीत शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या विशेष पुढाकाराने भव्य जाहीर सभा घेणार आहेत.
या सभेचे आयोजन बुधवार, सकाळी ११ वाजता शासकीय मैदानावर करण्यात आले असून, याबाबतची माहिती शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी दिली. शिंदे यांचे आगमन निश्चित झाल्यापासून शहरात उत्साहाची लाट उसळली आहे. विशेषतः महिला वर्गात चर्चेचा एकच सूर,“आपला भाऊ वणीत येतोय… स्वागत दणक्यात करायचं!
विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत शिंदे गटाला भक्कम पाठबळ दिले होते. त्या विश्वासाची कदर करत ‘लाडक्या बहिणींना भेट” देण्यासाठी शिंदे वणीला येत आहेत, हे विशेष ठरणारे आहे.दरम्यान, वणी नगरपरिषद निवडणुकीत विविध राजकीय समीकरणे रंगत असताना शिंदे यांच्या सभेमुळे निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या सभेतून “वणीत युती “एकत्र नसल्याची खात्री असतानाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे भाजपा बद्दल काय बोलतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच मुद्द्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.२६ नोव्हेंबरची ही सभा वणीच्या राजकीय क्षितिजावर एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल, अशी व्यापक चर्चा शहरात सुरू झाली आहे.

