Saturday, May 2, 2026
Homeवणीप्रभाग क्रमांक ६ मध्ये राजू रिंगोले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद.....

प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजू रिंगोले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद…..

• "बाप्पा मोरयाच्या" प्रसादाने रंगतदार वातावरण.

Ajay Kandewar, वणी :- नगरपरिषद निवडणुकीचा धुराळा शहरभर उसळला असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजू रिंगोले यांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. रिंगोले घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत असताना नागरिकांकडून “मोरया”चा प्रसाद देऊन स्वागत केले जात असून, या आनंदी वातावरणामुळे प्रचाराची रंगत आणखी वाढलेली दिसत आहे

तालुक्यातील राजकीय वातावरण तापत असताना रिंगोले यांच्या प्रचारयात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय मानला जात आहे. सकाळपासून सुरू होणाऱ्या घरदारी भेटीत महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, विकासाच्या आश्वासनांसह प्रभागातील समस्यांवर तोडगा काढण्याची भूमिका रिंगोले यांनी मांडली आहे.

प्रभागातील नागरिकांनी रिंगोले यांना “योग्य उमेदवार” म्हणून पाहत असल्याचे मोठ्या संख्येने व्यक्त होत असून घराघरात मिळणारा प्रसाद, आरती आणि शुभेच्छांमुळे प्रचारात धार्मिक-भावनिक रंगही भरला आहे.एकंदरीत, प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजू रिंगोले यांचा प्रचार वेगाने जोर धरत असून निवडणूक जवळ येताच या स्पर्धेत आणखी रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page