Sunday, July 26, 2026
HomeBreaking Newsवणीत शिंदे गटाचा शक्तिप्रदर्शनाने विरोधकांना "रट्टा....."

वणीत शिंदे गटाचा शक्तिप्रदर्शनाने विरोधकांना “रट्टा…..”

• नगराध्यक्ष पायल तोडसाम उमेदवारसह २९ उमेदवारी अर्ज दाखल.

Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ने सोमवारी दाखवलेले शक्तिप्रदर्शन पाहून प्रतिस्पर्धी पक्ष अक्षरशः हादरले.नगराध्यक्ष पदासाठी पायल तोडसाम तर नगरसेवक पदासाठी २९ उमेदवार असे तब्बल ३० अर्ज एकाचवेळी दाखल करत शिंदे गटाने वणीत आपली ताकद किती प्रचंड आहे हे पुन्हा सिद्ध केले.

विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल करताना रौद्र जल्लोष पाहून वणीतील राजकीय वातावरणच ढवळून निघाले.पायल तोडसाम यांच्या सभोवतालची प्रचंड गर्दी, शिस्तबद्ध मिरवणूक आणि टाळ्यांचा कडकडाटने निवडणूक कोणाच्या बाजूला झुकतेय याचे उत्तर विरोधकांना मिळालेच असे म्हणायला हरकत नाही.शहरातील महिला मतदारांची निर्णयक्षमता, राजकीय झुकाव आणि नेतृत्व स्वीकारण्याची वृत्ती हे सर्व पाहता वणीतील नेतृत्व पारंपरिकपणे शिंदे गटाच्या बाजूने झुकते हे गेल्या अनेक निवडणुकांत दिसले आहे.पायल तोडसाम यांच्या नावाने महिलांमध्ये झालेली प्रचंड चळवळ यंदाची निवडणूकही याच पॅटर्नला पुष्टी देणारी ठरते.२८ नगरसेवकांचे एकाचवेळी अर्ज दाखल होणे हे वणी राजकारणात क्वचितच पाहायला मिळते.

यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता, चर्चा आणि संभ्रम वाढला आहे.त्यातही शिंदे गटात विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व, तरुणांसोबत अनुभवी चेहऱ्यांचा समतोल यामुळे मुकाबला अधिकच कठीण झाला आहे. यावेळी शक्तीप्रदर्शनात असंख्य लोकांचा सहभाग यावेळी दिसून आला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page