Ajay Kandewar,Wani राजकारण:- नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच वणीच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला जातोय. “उबाठा-मनसे” युतीच्या हालचालींनी निवडणुकीचं चित्र पालटलं असून, भाजपाला आता आपल्या गोटात ‘सुरक्षिततेचा’ भास करणेही कठीण झालंय. हे स्पष्ट दिसत आहे.

वणीतील मतदार परंपरागतपणे व्यक्तिमत्त्व आणि कार्यसंस्कृतीकडे झुकतात. गेल्या काही काळात भाजपाने सत्ता टिकवली असली तरी स्थानिक पातळीवर जनाधाराचा ओघ कमी होत असल्याचं वास्तव पक्षाच्या गोटातही मान्य केलं जातं. त्यातच राज ठाकरे यांच्या भाषणांनी आणि स्थानिक स्तरावर उबाठा गटाच्या हालचालींनी नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.ही युती फक्त अंकगणिताचा खेळ नाही, तर ती जनतेच्या मनातील असंतोषाचं प्रतिक ठरू शकते. ठाकरे नावाचा भावनिक घटक, मनसेचा आंदोलनशील अंदाज आणि उबाठा गटाचं जमिनीवरील संघटन या त्रिसूत्रीने भाजपासाठी समीकरणं गुंतागुंतीची झाली आहेत. भाजपाचा देव पाण्यात, आणि भगवा पाण्यात उतरताच फिका झाला.ही फक्त उपहासात्मक ओळ नाही.ती वणीतील राजकीय वातावरणाची झलक आहे.मतदारांमध्ये बदलाची हवा आहे, आणि या हवेचा झोत कुणाच्या दिशेने वाहतोय, हे भाजपला सध्या नीट उमजत नाहीये.राजकारणात युती, फुट, आणि वाद हे नवे नाहीत. पण या वेळी प्रश्न फक्त जागांचा नाही ,प्रतिष्ठेचा आहे.भाजपासाठी ही निवडणूक “संघटनेचा कस” असेल, तर ऊबाठा गटासाठी “विश्वासाचा विजय”.वणीच्या राजकारणात भगव्याचा रंग कोण टिकवतो आणि कोणाचा पाण्यात विरतो…
वणीत महायुतीतही सुरुंग,शिंदे सेनेचा बोलबाला…
वणीचं राजकारण पुन्हा पेटलंय शिंदे सेनेनं “स्वबळावर लढणार” असा जाहीर बिगुल वाजवताच, महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत.भाजप अजून गणित जुळवण्यात गुंतलेली, पण शिंदे सेना मात्र जोमात मैदानात उतरलेली आहे.त्यातच उबाठा–मनसे समीकरण जमल्याने भाजप एकटी पडल्याचं चित्र अधिक ठळक झालंय.शिंदे सेनेचा बोलबाला, बाकींच्या गोटात गोंधळच गोंधळ.

