Ajay Kandewar, Wani: तालुक्यातील मोहदा गावातील शांततेचा भंग करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्याला शेवटी गावकऱ्यांच्या सहकार्याने उपसरपंच सचिन रासेकर यांनी १७ ऑक्टोबरच्या रात्री रंगेहात पकडून शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.या धाडसी कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, गावकऱ्यांकडून उपसरपंचांच्या धैर्याचे आणि पुढाकाराचे जोरदार स्वागत होत आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, उपसरपंच रासेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर बारीक लक्ष ठेवून होते. यापूर्वीही त्यांनी विक्रेत्याला पकडले होते, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांत नाराजी होती. अखेर योग्य वेळ साधून त्यांनी सुमारे ४० ते ५० पव्वे दारूसह अरविंद बोरोंदिया या विक्रेत्याला पकडून दुचाकी व मुद्देमालासह पोलिसांच्या हवाली केले.यानंतर शिरपूर पोलिसांनी संबंधितावर दारू विक्री व सेवनास प्रतिबंध असलेल्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उपसरपंच सचिन रासेकर यांनी दिली.आता गावात दारू विकायची नाही ,विकली तर पोलिस नाही,थेट ‘गाव रट्टा’ मिळेल.या इशाऱ्यामुळे गावातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुण वर्ग आणि महिला मंडळांनी उपसरपंचांच्या धाडसी कारवाईचे कौतुक करत त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ नागरिक यांची प्रतिक्रिया….
गावाकरीता सचिन रासेकर यांनी दाखवलेला पुढाकार म्हणजे गावात बदल.आता कोणत्याही गैरप्रकाराला गावात जागा मिळणार नाही – गावातील ज्येष्ठ नागरिक.

