Tuesday, April 21, 2026
HomeKayarपठारपुर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील जोड रस्त्याचे काम सुरू.......!

पठारपुर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील जोड रस्त्याचे काम सुरू…….!

•सिमेंट काँक्रिट रस्ता हा 2 कोटी 71 लाख रु मंजूर •सरपंच यांच्या पाठपुराव्याला.

अजय कंडेवार,वणी : तालुक्यातील अनेक वर्षापासून पठारपुर या गावात ग्रामवासियांना ये जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत होता परंतु गावातीलच सरपंच टेंभुर्डे यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ग्राम सडक योजनेसाठी वारंवार पत्रव्यवहार करून पठारपुर येथील जोडरस्त्याचे काम अखेर मार्गी लावण्यात सरपंचाला यश प्राप्त झाले आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत त्या जोडरस्त्याचे भूमीपूजन समारंभ आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पार पडला व रस्ता कामाला सुरुवातही दमदार स्वरूपात झाली. सदर सिमेंट काँक्रिट रस्ता हा 2 कोटी 71 लाख रु मंजूर करण्यात आला .

या प्रसंगी उद्घाटक आ.संजय देरकर होते.प्रमुख उपस्थित म्हणून सरपंच नीता टेमुर्डे, उपसरपंच रत्नमाला झाडें, उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ वणी विलास मांडवकर,वणी उपाध्यक्ष रंगनाथ विवेकानंद मांडवकर,विजय पारखी, अमोल काळे,जुमनाके,देवराव नांदेकर,विजय मांडवकर,पोलीस पाटील अमोल मांडवकर ,दीपक गारगाटे व पठारपूर ग्रामवासी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page