Ajay Kandewar,वणी:- तालुक्यातील नायगाव (झोला) शिवारात करोडो रुपयांचा शासनाचा महसूल खनिज संपत्ती अवैधरीत्या उपसा करून (रेती)चोरीला गेली आणि त्यात मशिन मालककावर गुन्हा दाखल न करता थातुरमातुर कार्रवाई करुन एक हायवा ट्रक, जेसीबी कंपनीचे पोकलॅन्ड मशीनवर अत्यंत साध दंड आकारला आणि त्यांना पुन्हा चोरी करण्यास तोंडी मुभा दिली असा घणाघाती आरोप करीत केला आहे. नायगाव (झोला) शिवारात हजारो ब्रास चोरी गेलेल्या रेतीसाठी स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी जबाबदार असल्याचं प्रथमदर्शी असुनही वणी तहसील प्रशासनाने मंडळ अधिकारी व तलाठी यावर कारवाई देखील केली नाही.”नेमक पाणी मुरत कुठ आहे?” असा सवाल उपस्थित करुन यातील ते मंडळ अधिकारी व तलाठी यांचे तात्काळ निलंबित करण्याकरिता युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या मार्फत म.राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून मागणी केली आहे. जर असे न झाल्यास येत्या काहीं दिवसांत उपोषण करणार असल्याचेही निवेदनात सांगीतले.

वणीचे तहसीलदार यांनी दि.6 एप्रिल रात्रौ २ वा. झोला या गावाजवळील वर्धा नदीवरील घाटावर धाड मारली. त्या कारवाहीत एक हायवा ट्रक, जेसीबी कंपनीचे पोकलॅन्ड मशीन जप्त केले. त्याठिकाणी त्या हायवा ट्रक मार्फत रेती तस्करी सुरु होती. अंदाजे सहा महिन्यापासून रेती तस्करी सुरु होती . जेंव्हा तहसिलदार यांनी धाड मारली असता, तो घाट अक्षरशः अवैधरीत्या पोकलॅन्ड मशीन ने पोखरलें. आणि करोडोचा महसूल चोरीला गेला.परंतू त्या नायगाव (झोला) भागाचे (मंडळ अधिकारी) व कुणाल आडे (तलाठी ) अनभिज्ञ कसें होतें.काहीं साटेलोटेनीच या दोघांनी स्पष्टं दुर्लक्ष केले.असा आरोप निवेदनात केला आहे.त्या घाटामधून हजारो बास (अंदाजे ३५००) रेती चोरी गेली तसेच ही खनीज राष्ट्राची संपत्ती आहे, आतापर्यंत फक्त तहसीलदार यांनी थातूरमातूर कारवाई केली असा स्पष्ट आरोप मी या निवेदनातून करत आहों. कारण शासनाचा महसुल चोरीला जातो आणि वणी महसूल प्रशासान फक्तं दंड लावतो कसा.? आणि चोरीला गेलेल्या रेतीची मोजणी देखील केली नाही हे गुलस्त्यातच आहे.साहेब हे तर खनिज चोरी आहे त्यामुळें जबाबदार मंडळ अधिकारी व तालाठी यांवर आधी निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे.कारण यांच्या आर्थिक संबधाशिवाय हे नक्किच घडल नसावं साहेब ? वणी प्रशासनानंन त्या अधिकाऱ्याना वाचविण्यासाठी धडपड केली व त्या एक हायवा ट्रक, जेसीबी कंपनीचे पोकलॅन्ड मशीन वर थातूरमातूर कारवाई करून सोडून दिले. असाही घणाघाती आरोप निवेदनातून करण्यात आला.
रेती तस्करांवर कठोर कारवाई तसेच संबंधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा जर आपणाकडून योग्य ती कारवाई झाली नाही तर येत्या काहीं दिवसांत संविधानरित्या उपोषण करणार असल्याचा इशारा युवासेना उपजिल्हा प्रमूख अजिंक्य शेंडे यांनी दिला.

