Ajay Kandewar,Wani:- अपने को पकडना मुश्किलही नही, नामुमकिन हैं’, अशा मस्तीत असणाऱ्या दरोड्यातील ‘बंगालसिंग’ची हवा वणी पोलीसांनी काढली.प्रगती नगर येथील दरोडयातील फरार आरोपी वणी पोलीसांना 7 महिन्यापासून तुतारी हाती देत होता व वणी पोलिसांपासून आपलीं ओळख लपवित होता. वणी SDPO पथकाने आरोपीची कसून शोध घेवुन 7 महिन्यानंतर या फरार आरोपीस 29 एप्रील रोजी वसमत येथुन ताब्यात घेत जेरबंद करीत वणी SDPO पथकाला शेवटीं यश आलें व आरोपीस यवतमाळ कारागृहात येथे 30 एप्रिल रोजी रवाना करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार,4 सप्टें 2024 चा मध्यरात्री प्रगतीनगर येथील रहिवासी असलेल्या सुभाष डोर्लीकर यांच्या घरी काहीं दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न फसला होता. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या 2 दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळलें होतें. यात समाविष्ट असणारा मुकिंदसिंग टाक, सावनसिंग टाक यांना जालना येथून अटक केली. पोलिसांना घटनेत वापरलेली कार देखील मिळाली. तर सतनामसिंग चव्हाण याला वसमत येथून अटक केली. यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे तार वणीशी जुळलेले असल्याचे समोर आले होते .पोलिसांनी या घटनेची मास्टरमाइंट असलेले भाऊ बहिण राणी ब्राह्मणे व तिचा भाऊ समिंदरसिंग टाक दोघेही रा. गोकुळनगर वणी यांना अटक केली होती.यातील फरार आरोपीला वणी पोलीसांनी अखेर 7 महिन्यानंतर गुन्ह्यातील सातव्या आरोपीला वसमत येथुन ताब्यात घेत अटक केली व आरोपीस न्यायालयीन कोठडी यवतमाळ येथे रवाना केलें.
•गोकुळनगर येथील बहीण भावानें असा तयार केला होता दरोड्याचा प्लान…
मुख्य सूत्रधार राणी विनोद ब्राह्मणे हिने तिचा भाऊ समिंदरसिंग टाक हे गोकुळनगर येथील रहिवासी आहे. समिंदरसिंग हा काही वर्षांपूर्वी डोर्लीकर यांच्याकडे कामाला होता. त्यामुळे समिंदरसिंगला डोर्लीकर यांच्याबाबत संपूर्ण माहिती होती. त्याने याबाबत तिच्या बहिणीला सांगितले. तसेच डोर्लीकर यांचा मुलगा व मुलगी हे बाहेरगावी शिकत असतात. घरी केवळ डोर्लीकर दाम्पत्यच घरी असते याची देखील माहिती काढली. त्यानंतर दोघा बहिण भावांनी दरोड्याचा प्लान केला. दरोड्यासाठी मदत म्हणून त्यांनी त्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील नातेवाईकांना संपर्क साधला. या नातेवाईकांनी कारची अरेंजमेंट केली. दरोडा टाकण्याची तारीख ठरली. तसेच दरोड्यात कुणाचा किती शेअर असेल हे ठरले. त्यानंतर 6 जणांनी 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री डोर्लीकर यांच्या घरी दरोडा टाकला.दरोडा घडताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती. सीसीटीव्ही फूटेज चेक व लोकेशन चेक करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी जालना येथून 个 दोघांना, एकाला वसमत येथून अटक केली.पंरतु यातील सातवा आरोपी बंगालसिंग उर्फ साहेबसिंग रतनसिंग चव्हाण (36) रा. रेल्वे स्टेशन जवळ ,वसमत, जि-हिंगोली हा गुन्हा केल्यापासुन आपले अस्तीत्व लपवत होता. आरोपीचा शोध वणी पथकामार्फत सुरुच होता.वणी पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत सातव्या आरोपीस वसमत येथुन ताब्यात घेवुन अटक केली व आरोपीस न्यायालयीन कोठडी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, वणी SDPO गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली वणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे विजय वानखडे,ईक्बाल शेख, वसीम शेख, व अमोल नुन्नेलवार यांनी केली.

