Friday, October 23, 2026
HomeवणीPahalgam Attack : वणीत युवासेनेतर्फे शोक,संताप व निषेध….!

Pahalgam Attack : वणीत युवासेनेतर्फे शोक,संताप व निषेध….!

Ajay Kandewar,Wani:- जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वणी शहरात युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे चा नेतृत्त्वात गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकित पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. युवासेनातर्फे विविध घोषणाबाजी करीत पाकिस्तान विरोधात एल्गार पुकारला तसेच पाकिस्तानी झेंडा व बॅनर जाळून कडाडून निषेध नोंदविला.

पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्या विरोधात युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्त्वात वणी येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार युवासेनेचे सैनिकएकत्रित येऊन पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत नारेबाजी करण्यात आली व पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या अपयशाचा निषेध करुन या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व भारतीय पर्यटकांना युवासेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सबिर शेख, कुंदन पेंदोर,मनोज वाकटी, गौरव पांडे, मिलिंद बावणे, आशुतोष नागबिडकर, विनोद दुमणे, धनराज येसेकर, आकाश तमिलवार, संदीप बावणे,शुभम नागपुरे, मयूर खांडरे, राजू चिंचोलकर, सचिन कळमनकर, आकाश पेंदोर,अनिकेत बदकल,अभिषेक गुंडावार, बादल येसेकर, आर्या राऊत, संघर्ष शेंडे ,बबन केळकर व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page