Ajay Kandewar,Wani:- विविध गुन्ह्यांमध्ये जप्त वणी पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून असलेल्या 34 वाहनांचा दि.12.एप्रिल रोजी जाहीर लिलाव करण्यात आला. बेवारस वाहनाच्या लिलावातून शासनाच्या तिजोरीत 87 हजार रु.महसूल प्राप्त झाला. हा लिलाव वणी पोलीस स्टेशन येथील दक्षता भवन मध्ये घेण्यात आला यात 47 स्क्रॅप मर्चंट उपस्थित होते.
वणी ठाण्याचा प्रांगणात विळखा पडलेल्या जुनाट आणि गंजलेल्या 34 वाहनांचा शनिवारी लिलाव करण्यात आला. जप्त गाड्यांचे मूल्यांकन करून केलेल्या या लिलावातून सरकारी तिजोरीत 87 हजार रु.जमा झाला आहे.अखेर वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तहसीलदार, यवतमाळ A.R.T.O प्रभारी अधिकारी,पो.स्टे.वणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांचा समक्ष 34 वाहनांचा बोली पद्धतीने लिलाव आयोजित आला होता. या सर्व गाड्यांचे आरटीओ निरीक्षकांद्वारे बाजार भावांप्रमाणे मूल्यांकन निश्चित करून लिलावासाठी ठेवण्यात आले होते.

