•राजूर (ईजारा) येथील घटना.
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील राजूर ईजारा येथील एका 21 वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास A 21-year-old girl ended her life by hanging herself. लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
नेहा सुभाष पंडलवार (वय 21 वर्ष,रा.राजूर इजारा ) असे आत्महत्या करणार्या तरूणीचे नाव आहे. नेहा हीने गुरूवार (दि.9.मार्च) आपल्या राहत्या घरातीलच आड्याला ओढणीचा सहायाने गळफास लावून घेतला होता.ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी पोलीसांना माहिती दिली. तसेच तिला तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. तिचा आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहेत.A 21-year-old girl ended her life by hanging herself.