Thursday, March 5, 2026
HomeBreaking News14 सप्टेंबरला वणी ठरेल साक्षीदार .....

14 सप्टेंबरला वणी ठरेल साक्षीदार …..

14 सप्टेंबरला वणी ठरेल साक्षीदार .... •रंगनाथ स्वामी पतसंस्थेची ऐतिहासिक आमसभा.

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र कार्यक्षेत्रात अग्रगण्य, 21 शाखा असणारी तसेच सभासदांचा साथीने अॅड देविदास काळे यांच्या उत्कृष्ट नेतृत्वात समस्त संचालक मंडळ यांचा विशेष सहकार्याने भक्कम छाप पाडलेली श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी ही पतसंस्था. या संस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी, रविवारी दुपारी बरोबर 12 वाजता वसंत जिनिंग हॉल, वणी येथे पार पडणार आहे.

या संस्थेत 872 कोटींच्या भक्कम ठेवी, तब्बल 91 हजारांहून अधिक सभासदांची साथ आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर ही संस्था आज 1000 कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास म्हणजे श्रम, प्रामाणिकपणा आणि लोकविश्वास यांचं प्रतिक ठरला आहे. या सभेत केवळ आर्थिक हिशेब मांडला जाणार नाही, तर संस्थेच्या पुढील दशकासाठीचा ‘व्हिजन डोक्युमेंट’ सुद्धा उलगडला जाण्याची शक्यता आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांचे आवाहन….

“सभासदांच्या पाठबळावर संस्था आज या उंचीवर पोहोचली आहे. भविष्यातील वाटचाल हजार कोटींच्या पलीकडे नेण्यासाठी सर्व सभासदांची भूमिका महत्त्वाची आहे.”स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ, शेतकरी-शेतीला आधार, छोटे उद्योजक व सर्वसामान्य कुटुंबांना वित्तीय मदत देत ही संस्था खऱ्या अर्थाने “जनतेची पतसंस्था” बनली आहे.आता 14 सप्टेंबरला होणारी आमसभा ही केवळ औपचारिकता नसून, संस्थेच्या भविष्याचा आराखडा ठरवणारी आणि सभासदांसाठी ऐतिहासिक टप्पा सिद्ध होणारी सभा ठरणार आहे.प्रत्येक सभासदाने ही सभा गमावू नये. वेळेवर व ठराविक ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page