Friday, October 23, 2026
HomeBreaking News“हेमंत बृजवासींच्या सुरमयी जगरात्याने वणीत उमटला भक्तिरसाचा झंकार”.......!

“हेमंत बृजवासींच्या सुरमयी जगरात्याने वणीत उमटला भक्तिरसाचा झंकार”…….!

•आकर्षक मंडपात, हजारो भाविकांची गर्दी उसळली.

अजय कंडेवार,वणी | कृष्णभक्तीच्या अवीट गोडीत आणि सुरांच्या माधुर्यात न्हालेली वणी, शुक्रवारी रात्री  अविस्मरणीय जगरात्याची साक्षीदार ठरली.जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचा वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक हेमंत बृजवासी यांच्या गगनभेदी आणि भावमधुर स्वरांनी संपूर्ण वणी शहर भक्तिरसात रंगून गेले.

जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने आयोजित या जगरात्यात परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हेमंत बृजवासींच्या सुमधुर भजनांनी आणि कीर्तनांनी वातावरणात एक अद्वितीय भक्तिभाव निर्माण झाला. “मैया मोरी मैं नहीं माखन खायो”, “श्याम तेरी बंसी पुकारे”, अशा एकापाठोपाठ एक सुरेल सादरीकरणांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.रात्रीचा या भक्तिसोहळ्यात भाविकांनी टाळ्या, जयघोष आणि भजनांच्या गजरात श्रीकृष्णनामाचा गजर करत वातावरण भारून टाकले. समितीचा वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व सुंदर सजावट तसेच भव्य वॉटरप्रूफ मंडपामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले.

या जगरात्याने वणीतील भाविकांना केवळ भक्तिरसाचा अमृतानुभवच नाही तर एकतेचा आणि श्रद्धेचा संदेश दिला. हेमंत बृजवासींच्या स्वरगंगेत न्हालेली ही रात्र वणीकरांच्या मनात कायमची घर करून राहील म्हणून वणीकर ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया व जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सचिव उमेश पोद्दार यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केल्या जात आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार तसेच नेते व अनेक दिग्गजांनी हजेरी लावली .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page