Tuesday, October 14, 2025
HomeBreaking Newsसंजय देरकर यांच्या प्रचार कार्यालयांचे थाटात उद्घाटन........!

संजय देरकर यांच्या प्रचार कार्यालयांचे थाटात उद्घाटन……..!

•वणी विधानसभेत मशाल पेटवायची हाच ध्येय.

Ajay Kandewar,Wani:- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारांनी प्रचार मोहिमेचा आरंभ केला आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाविकास आघाडी एकवटली आहे. संजय देरकर यांच्या तीनही तालुक्यातील प्रचार कार्यालयांचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

शहरातील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर वणी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर वनोजादेवी मंदिरात महाआरती व भांदेवाडा येथे जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मारेगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments