वणी (प्रतिनिधी) : “शहराचे कायापालट करणारे विकास पुरुष” अशी ओळख मिळवलेले माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत शुभेच्छुक अॅड. निलेश माया महादेवराव चौधरी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करताना त्यांना जनतेच्या मनातील खरे विकासपुरुष म्हणून गौरविले आहे.
आपल्या कार्यकाळात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी वणी विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या जगण्याचा स्तर उंचावला. त्यामुळेच त्यांना “कायापालट करणारे” ही बिरुदं मिळाली.
त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये म्हणजे – वचने देऊन विसरणे नाही, तर दिलेलं वचन पूर्ण करून दाखवणे. प्रत्येक प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर ठोस निर्णय घेण्याची त्यांची कार्यशैली आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच जनतेत त्यांच्याविषयी अढळ विश्वास निर्माण झाला आहे.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा एकच सूर आहे –“आमच्या मतदारसंघाच्या विकासाचा पाया घालणारे हेच खरे विकास पुरुष आहेत. भविष्यात पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली आमचा मतदारसंघ प्रगतीची शिखरे गाठेल.”
शुभेच्छुक:- शहर अध्यक्ष अॅड. निलेश माया महादेवराव चौधरी व समस्त पदाधिकारी.