Tuesday, March 10, 2026
Homeवणीवर्षानुवर्षे " या " मूलभूत सुविधांपासून वंचित..!

वर्षानुवर्षे ” या ” मूलभूत सुविधांपासून वंचित..!

जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्या नेतृत्वात असंख्य महिला व पुरुष S.D.O च्या दालनात.

अजय कंडेवार,वणी:- शहरातील अनेक गरजू नागरिक पंतप्रधान आवास योजना (घरकुल) पासून वंचित आहे तसेच अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरिता अनेक वर्षापासून नागरिक कार्यालयीन येरझऱ्या मारीत आहे,परीसरातील मुलभूत गरजा जसे रस्ते, नाल्या,पाणी,विद्युत इत्यादी पासून नागरिक वंचितही आहे व शहराचे विकास कामेही खुंटल्याने ते लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्याकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांचा नेतृत्वात वणी शहरातील असंख्य महिला व पुरुषांनी  आज दि.8 जून रोजी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांचा मार्फत पालकमंत्री संजय राठोड यांना साकडे घालण्यात आले.Wanikar has been deprived of “these” basic facilities for years..! •Many women and men under the leadership of District Vice President Izhar Shaikh in the hall of S.D.O.

गेल्या २०१७ ते सन २०२४ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेची योजना आली असून वणी शहरात या योजनेची अंमलबजावणी फक्त मालकीचे प्लॉट धारकांना या आवास योजनेचा लाभ दिला परंतू मंजूर झालेले घरकुल धारकांना अजुनपर्यंत घरकुल मिळालेले नाही. ज्या परिसरात गरजू लोक राहतात त्यांनाचा या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.तसेच गोकुळनगर, रजानगर, रंगनाथ नगर, खडबडा, रामपूरा, सेवानगर, नारायण निवास मागील भाग बरडपूरा, गांधीनगर, शास्त्रीनगर, रंगारीपूरा, भोईपूरा, बेलदारपूरा, मोमीनपुर, पंचशिलनगर, माळीपूरा, पहाडपूरा, सम्राट अशोकनगर, एकतानगर, जागृतीनगर, भिमनगर, दामले फैल, तेली फैल, सर्व स्लम एरीया या परिसरात मागील अनेक वर्षापासून मुलभूत गरजा पूर्ण केल्या गेल्या नाही. गोकुळनगर येथील तलाव सौदर्यीकरण व लहान मुलांकरीता बगीचा अश्या प्रकारचे विकास कामे करण्यात यावे.या परिसरातील अधिकांश परिसर दलित वस्ती योजनेअंतर्गत येत आहे, तरीपण या परिसरातील नागरीकांवर अन्याय होत आहे. दलित वस्ती अंतर्गत कामे झालेली नाही. रस्ते,पाणी, नाली व विद्युत असे अनेक समस्या या परिसरात वाढलेली आहे. करीता या निवेदनाव्दारे मागणी करीत आहो की, आपण लक्ष देऊन होत असलेला अन्याय दूर करावा तसेच मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यावेळी इजहार ग्यासुद्दीन शेख (जिल्हा उपाध्यक्ष),दिलीप मालेकर, प्रमोद लोणारे ,नईम अजीज, गुलाम रसूल रंगरेज, संतोष सिद्धमशेट्टीवार,अक्षय धावंजेवार,निलेश लांडे ,रमेश तांबे, डॉ. विवेक गोफणे,दिपक मधुकर तिरमलवार, दिनेश रायपुरे, दिनेश पाऊनकर व शहरातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page