Saturday, April 25, 2026
HomeBreakingवणीतील राजा जैस्वाल दांपत्यासह चिमुरड्या मुलीचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू......

वणीतील राजा जैस्वाल दांपत्यासह चिमुरड्या मुलीचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू……

•वणीत काशी शिवमहापुरान करणारे आयोजक. •केदारनाथ मार्गावरील घटना.

Ajay Kandewar, Wani:- उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट देण्यासाठी गेलेल्या यवतमाळच्या जैस्वाल कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली. रविवारी (12 जून 2025) सकाळी केदारनाथ मार्गावर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील राजकुमार जैस्वाल,(41) त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल (35)आणि त्यांची दोन वर्षांची चिमुरडी काशी जैस्वाल (22 महिने)यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे.मुलगा विवान पांढरकवडा येथील आजोबाकडे थांबल्याने बचावला.एक वर्षांपूर्वी मुलगी काशी असे नामकरण केले होते. काशी हिच्या नावाने वणीत काशी शिवमहापुरान प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन करणारे दाम्पत्य होते.

•वातावरणातील बदलामुळे घडली दुर्घटना…

ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान घडली. आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने निघाले होते. मात्र, केदारनाथ खोऱ्यात दाट धुके आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर भरकटले. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते गौरीकुंडच्या जंगलात  खराब हवामान हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या अपघातात पायलटसह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page