Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना उबाठा गट यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवार २५ मार्च रोजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष जाहीर केल असून संजय निखाडे हे यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. या नियुक्तीमुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. वणी विधानसभेतील उबाठा गटाचे संजय देरकर यांनी आमदारकी मिळविल्यानंतर यवतमाळ जिल्हाध्यक्ष पद याकडे अनेकांचे डोळे या रिक्त पदाकडे लागले होतें आणि तसेच नवीन जिल्हाध्यक्षाची घोषणा केली जाणार असल्याचे ऐकू येत होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कट्टर शिवसैनिक एकनिष्ठ व्यक्तीची वर्णी लागेली अशी ही चर्चा होती. अखेर हक्काचा माणूस सापडला अशी शिवसैनिकांतून ऐकू येत असून आनंद ही होत आहे.संजय निखाडे यांनी निवडीचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड, वणी आमदार संजय देरकर यांना दिले .
कोट……
जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ राहून ठाकरे गट अभेद्य ठेवतील. ते रस्त्यावरची लढाई लढत राहतील. यवतमाळ जिल्ह्यात अनेकदा राजकीय घडामोडी घडल्या; परंतु मातोश्रीवरून आलेल्या आदेशानुसार शिवसैनिक काम करत राहिला आहे. इथून पुढे तसेच काम करत राहतील. शिवसेनेत कोण आले, कोण गेले यापेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनावाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.- नवनियुक्त यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे.

