Sunday, August 30, 2026
HomeUncategorizedमार्कीतील 'आझाद' हत्याकांडात "सचिन,साहिल व CCTV" ट्रँगल मिस्ट्री......

मार्कीतील ‘आझाद’ हत्याकांडात “सचिन,साहिल व CCTV” ट्रँगल मिस्ट्री……

Ajay,Wani :- झरि तालुक्यातील मुकूटबन पोलिस स्टेशन हद्दीतील 9 जून रोजी मार्की येथील ढाबा चालक आझाद उदकवार हत्या प्रकरणात घटनेच्या दिवशी साहिल काकडे व सचिन टोंगे हे दोघेही मुकूटबन पोलीस ठाण्यात आले होते,आधी धाब्यावर झालेल्या वादाची माहिती देण्यात आली होती आणि तरीही त्यांना तक्रार न घेता परत पाठविण्यात आले, असा गावकऱ्यामधून घणाघाती आरोप होत आहे ,असा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कारण त्यानंतरच विदर्भा ढाबा चालक आझाद उदकवारांचा जीव गेला असावा आणि आज दोन व्यक्ती नाहक आरोपी झाले असावे अशीही चर्चात्मक माहिती गावकऱ्यांकडून समोर येत आहेत. त्यामुळे त्या घटनेचा दिवशी पोलीस ठाण्यात नेमके काय घडले,मुकूटबन पोलिसांनी कोणती भूमिका बजावली आणि संबंधितांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला असेल तर कोणी घेतला, याचा तपास होणे आता अत्यावश्यक झाले आहे. यासाठी घटनेच्या दिवसाचे CCTV फुटेज आणि स्टेशन डायरीची हलचल तपासली तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

मुकूटबन पोलीस ठाण्यात संबंधित ते दोन व्यक्ती साहिल व सचिन किती वाजता आले, कोणासोबत आले, कोणत्या पोलिस अधिकाऱ्याशी बोलले तसेच रिपोर्ट घेत नसल्याची विनवणीचा फोन  गावातील कोणत्यातरी एका मोठ्या व्यक्तीला देखील केला आणि ठाण्यात किती वेळ ते दोघे थांबले हे CCTVमधून स्पष्ट होऊ शकते आणि आरोपीचा CDR काढला तर तेही पुरावा खरा ठरू शकतो.त्याचवेळी त्या दिवशी स्टेशन डायरीवर असलेला अंमलदार कोण होता, त्याने आलेल्या व्यक्तींची तक्रार घेतली का,माहितीची नोंद केली का, NC अथवा आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई केली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे याचीही चौकशी झाली पाहिजे. तक्रार घेण्याऐवजी परत पाठविले असेल, तर हा निर्णय कोणाचा होता? याचा खुलासा आता होणे गरजेच आहे.

एका बाजूला मृतक आझाद उदकवार कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला, तर दुसरीकडे दोन व्यक्ती आरोपी बनले त्यामुळे खरा प्रकार कोणता, हे निष्पक्ष तपासातून समोर येणे गरजेचे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन CCTV फुटेज सुरक्षित करावे, स्टेशन डायरी तपासावी, आरोपीचे फोन CDR काढावी आणि त्या दिवशीच्या पोलिसांची भूमिका निश्चित करावी. कर्तव्यात कसूर आढळल्यास निलंबनासह कठोर कारवाई का करून या मर्डर मध्ये सहआरोपी करावे, याचे उत्तरही वरिष्ठांनी द्यावे. अशी गावकऱ्यातून बोलल्या जात आहे.

एक जीव गेला… दोन जण आरोपी झाले; पण CCTV काय सांगते ?

आझाद उदकवार कुटुंब उद्ध्वस्त, दोन आरोपींवर गुन्ह्याची टांगती तलवार; घटनेपूर्वी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची चौकशी का नाही?हत्या प्रकरणात एका कुटुंबाचा आधार हरपला. एका व्यक्तीचा जीव गेला आणि त्यानंतर दोन जण आरोपी म्हणून समोर आले. मात्र, हेच खरे आरोपी आहेत का, की घटनेपूर्वीच्या परिस्थितीचा आणि पोलिस ठाण्यात घडलेल्या प्रकाराचा पुरेसा तपास न झाल्याने दोन व्यक्तींना या प्रकरणात विनाकारण गोवले जात आहे? असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे.ज्या दिवशी घटना घडली, त्याच दिवशी संबंधित व्यक्ती मुकुटबन पोलीस ठाण्यात आल्या होत्या, अशी माहिती समोर येत असेल, तर या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा पुरावा पोलीस ठाण्यातील CCTV फुटेज ठरू शकतो.कॅमेऱ्यात काय कैद झाले?

कोण कोण पोलीस ठाण्यात आले?किती वाजता आले?

कोणासोबत आले?कोणत्या अधिकाऱ्याशी किंवा पोलिस कर्मचाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली?कशासाठी आले?तक्रार मांडली का?तक्रार घेतली का?आणि शेवटी त्यांना परत कोणी पाठविले?या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय केवळ दोन व्यक्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून संपूर्ण प्रकरण संपविणे योग्य ठरेल का?एकीकडे उदकवार कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला; दुसरीकडे दोन व्यक्तींवर आरोपीचा शिक्का बसला. पण घटनेपूर्वीची संपूर्ण साखळी तपासली आहे का?पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्ती आल्या असतील आणि त्यावेळी त्यांच्याकडून तक्रार अथवा वादाची माहिती देण्यात आली असेल, तर त्या माहितीवर पोलिसांनी काय कार्यवाही केली, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.उदकवार कुटुंबाला न्याय हवा.पण तो खऱ्या आरोपीला शिक्षा देऊनच मिळाला पाहिजे. आणि जर दोन निरपराध व्यक्तींवर आरोप लादले जात असतील, तर त्यांनाही न्याय मिळालाच पाहिजे.म्हणूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात CCTV, स्टेशन डायरी आणि घटनेपूर्वीची तक्रार प्रक्रिया यांची स्वतंत्र चौकशी करण्याचे तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page