Tuesday, December 23, 2025
HomeUncategorizedब्रेकिंग न्यूज : वणी शहरात फूड ऑफिसरची दमदार एन्ट्री.... 

ब्रेकिंग न्यूज : वणी शहरात फूड ऑफिसरची दमदार एन्ट्री…. 

तंबाखू तस्करांमध्ये खळबळ,पुढचा नंबर कोणाचा?

Ajay Kandewar, Wani : – शहरातील पंचशील नगर परिसरात 112 वरून आलेल्या तातडीच्या कॉलनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त झालेल्या सुगंधित तंबाखूच्या प्रकरणाला अखेर मोठे वळण मिळाले आहे. सलग दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर (अन्न व औषध)फूड ऑफिसर वणी शहरात दाखल होताच वातावरण चांगलेच तापले. (अन्न व औषध) फूड ऑफिसर यांनी थेट वणी पोलिस ठाण्यात हजेरी लावून जप्ती प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, या कारवाईची सर्वाधिक झळ पंचशील नगर येथील कारवाई पाठोपाठ “त्या…ज्योती” दुकानाला बसणार हे समीकरण आता स्पष्ट झाले असून त्या दुकानावर कारवाईची टांगती तलवार अधिक तीक्ष्ण होताना दिसत आहे.शहरात मात्र आणखी एक चर्चा वेगाने पसरत आहे.काही सूत्रांच्या माहितीनुसार, “त्या… ज्योती”मधून ‘महत्त्वाचा माल तात्काळ हलवून कुठेतरी लपवण्यात आल्याची मोठी कुजबुज सुरू आहे. नेमका कोणता माल हलवण्यात आला? तो कोणी हलवला? आणि कोठे ठेवण्यात आला? याबाबत मात्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पण शहरभर या चर्चेला प्रचंड ऊत आलेला आहे.

(अन्न व औषध) फूड ऑफिसरची एन्ट्री, पोलिसांची आधीची धडक कारवाई आणि  त्या …ज्योती प्रकरणाचा वाढता गोंधळ हे सर्व पाहता वणीतील तंबाखू रॅकेटवर मोठी कारवाई होण्याची चिन्हे अधिकच ठळक होत चालल्याचे जाणकारांचे मत आहे.शहरातील नागरिक आता एकच प्रश्न विचारत आहेत.“ही कारवाई कुठपर्यंत थांबते… आणि पुढचा नंबर कोणाचा?” हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. वणीत 2 दिवसांचा ठिय्या असल्याची विश्वानीय माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments