Sunday, August 30, 2026
HomeBreaking Newsप्रभाग 8 मध्ये उबाठा–भाजपची घसरण; जनतेचा कल बदलतोय....

प्रभाग 8 मध्ये उबाठा–भाजपची घसरण; जनतेचा कल बदलतोय….

•"सुधीर " बाबत प्रभागात स्पष्ट नाराजी.

Ajay Kandewar,Wani:- प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना (उबाठा)चे सुधीर रिमदेव थेरे यांची पत्नी नगरपरिषदेत पद भूषवित होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात विकासकामांचा शून्य आलेख पाहता मतदारांमध्ये प्रचंड नाराजी वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनांची आतषबाजी करत वास्तवात कामे ठप्प ठेवणाऱ्या उबाठाच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास उडाल्याची चर्चा सध्या रस्सीखेचीत रंगली आहे.

दरम्यान भाजपाचेही “फक्त घोषणा आणि फोटोसेशन”पुरते राजकारण मतदारांना आता सरळसोट उघड झाले असून प्रभाग 8 मध्ये भाजपाविषयीचा कलही स्पष्टपणे कमी झाल्याची कुजबुज ऐकू येत आहे. पदावर असतांना काहीच दिले नाही, आणि पुन्हा मत मागायला येत असल्याचा आरोप नागरिक खुलेआम करताना दिसत आहेत.यामुळें जनतेचा कल शिंदे सेनेकडे झपाट्याने वळताना प्रभाग 8 मध्ये जाणवत आहे. विकासाचे ठोस आराखडे, जमिनीवर उतरलेली कामे आणि परिसरातील प्रश्नांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न या आधारे शिंदे सेनेचा उमेदवार मतदारांच्या पसंतीस उतरत आहे.एकूणच, प्रभाग क्रमांक 8 मध्ये ऊबाठा आणि भाजपाची हवा खेळती, तर शिंदे सेनेचा झेंडा मजबूतपणे फडकू लागल्याचे राजकीय चित्र सध्या स्पष्टपणे उमटत आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page