Ajay Kandewar,Wani:- राजकारणाच्या गर्दीत नेते बदलतात, पक्षफुटी होतात, स्वार्थासाठी पदं बदलली जातात; पण तरीही काही व्यक्ती निष्ठेच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ढाण्या वाघ इरशाद खान हा निष्ठावान पदाधिकारी म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या प्रत्येक लढाईत राजू भाऊ उंबरकर यांना आपले आदर्श मानत त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून साथ दिली. केवळ भाषणबाजी किंवा दिखावा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नेहमी वाहतुकीबाबतचे जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. कोणत्याही समस्या असोत, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असो किंवा स्थानिक पायाभूत सुविधा – प्रत्येक ठिकाणी इरशाद खान धावून गेले.
त्यांची कार्यशैली साधी पण परिणामकारक आहे. पद, प्रसिद्धी किंवा वैयक्तिक स्वार्थ याकडे न पाहता “पक्ष आणि जनता” हाच त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला. त्यामुळे आज ते केवळ मनसे मध्येच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही विश्वासार्ह चेहरा म्हणून उभे राहिले आहेत.आजच्या राजकारणात जेव्हा निष्ठा ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे, तेव्हा अशा पदाधिकाऱ्याच अस्तित्व म्हणजे पक्षासाठीच नव्हे तर समाजासाठीही एक मोठी ताकद आहे. कारण नेत्यांच्या भाषणांनी नव्हे तर कार्यकर्त्यांच्या निष्ठेनेच पक्षाची खरी ओळख टिकून राहते.म्हणूनच, या निष्ठावान मनसेचा ढाण्या वाघ इरशाद खान यांचं कौतुक जितकं केलं जाईल तितकं कमीच आहे. त्यांचा निःस्वार्थी प्रवास आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारा आहे.