Wani : वणीतील कृष्णा मास्टर्स अकॅडमी चे संचालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शक प्रा. निलेश निवलकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज अकॅडमी परिसरात आनंदाचे वातावरण होते. ज्ञान, शिस्त आणि प्रेरणा यांचा संगम घडवणाऱ्या निवलकर सरांना विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि मित्रपरिवाराने हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला.

प्रा. निवलकर सरांनी शिक्षण क्षेत्रात केवळ गुणवत्तेचा ध्यास घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मंत्रही रुजविला. त्यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा मास्टर्स अकॅडमी ने अल्पावधीतच वणी परिसरात आपली शैक्षणिक ओळख अधिक दृढ केली आहे.या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारीवर्ग आणि माजी विद्यार्थी यांनी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्य, आनंद आणि उत्तरोत्तर यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
“शिक्षण हा केवळ विषय नाही, तर समाज घडवण्याचा संस्कार आहे” — प्रा. निलेश निवलकर

