•कायर गावातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर,
•कर्मचाऱ्यांवर गावकरी संतप्त.
अजय कंडेवार,वणी :– तालुक्यातील कायर गावातील एका पळीचा शेतात झुकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारा वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे भयंकर असे चित्र या परिसरात दिसत आहे. जणु काही मृत्यूला निमंत्रणच हे झुकलेले खांब देत असल्याचे स्पष्ट चित्र आहे कारण या तारांना शेतीमशागतीचे कामे करतांना ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे स्थानिक मुजोर ,निद्रावस्थेत असणारे महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.In the distant fields of Hake, the electric pole is leaning. and the workers are idle.On the mischievous governance of the cowardly village •Villagers angry with employees.
वास्तविक पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे जलदगतीने करणे गरजेचे आहे, मात्र महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला असून मान्सूनपूर्व कामे लवकर करून वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा ओढून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कायर परिसरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ३५ ते ४० वर्षांपूर्वीची विद्युत वाहक यंत्रणा आहे. त्यामुळे जुन्या विद्युत वाहक तारा, खांब कमकुवत झाले आहेत. परिणामी थोड्याशा सोसाट्याच्या वाऱ्याने तारा एकमेकांना घासल्यास वीजपुरवठा खंडित होतो; तसेच वारा जास्त वेगाने आल्यास खांब वाकतात. कित्येक ठिकाणी विद्युत खांबाचे ताण गायब झालेले आहेत, मात्र वीज वितरण कंपनीने हे ताण पुन्हा बसविण्याची तसदी घेतली नाही. वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्यी क्षेत्रात तारा, खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे, ताण देणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे, तुटलेल्या तारा जोडणे, झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमशागतीची कामे करताना अडचण येत आहे; तसेच एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे करून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कामाच्या दर्जाबाबत शंका..
“कायर भागात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीला युद्धपातळीवर मान्सूनपूर्व कामे हाती घेण्याची गरज आहे. गेल्यावर्षी केलेल्या कामानंतर खांब वाकणे, वीज वाहक तारा लोंबकळणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, ताण जमिनीतून उपटून येणे आदी प्रकार घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्यावर्षी केलेल्या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पेरणीच्या कामात अडथळा..
“सध्या शेतीची मशागतीची कामे झपाट्याने होणार आहे. कारण पेरणीजवळ येऊन ठेपली आहे. पाऊस पडल्यानंतर शेतात चिखल होतो. तेव्हा वीज दुरुस्तीचे कामे करणे शक्य नाही त्यामुळे या झुकलेल्या तारा, वाकलेले खांब यामुळे पेरणीच्या कामात मोठा अडथळा येण्याची दाट शक्यता आहे.”
“मान्सूनपूर्वचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहेत. वाकलेले खांब व लोंबकळलेल्या तारा निदर्शनास आणून दिल्यास, त्या तात्काळ दुरुस्त करून देण्यात येईल” तसेच येत्या 4 ते 5 दिवसात त्या शेतातील झुकलेला खांब दुरुस्त करण्यात येईल.
– लाईनमेन, (मुकुटबन डी.जी.)