Thursday, March 5, 2026
Homeवणीस्पर्धा परीक्षेचा विद्यार्थाचे भवितव्य धोक्यात.....!

स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थाचे भवितव्य धोक्यात…..!

•Online परीक्षाच रद्द करा,हजारों विद्यार्थी तहसिलवर धडकले.

अजय कंडेवार ,वणी:- तलाठी परीक्षेचा निकाल नुकताचा लागला. हा निकालात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. परिणामी परीक्षार्थ्यांत चा फायदा घेत संभ्रम निर्माण होणारा निकाल आहे, टी सी एस व आय.बी.पी.एस मार्फत संपुर्ण महाराष्ट्रात विविध पदांच्या परिक्षा घेण्यात येत आहे.शासनाने या परीक्षा घेणाऱ्या कंपनीची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावे व तसेच भरती संदर्भात विविध मागण्या घेऊन हजारों विद्यार्थ्यानी दि.11 जाने.2024 रोजी तहसिल कार्यालयावर धडक देत S.D.O मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना निवेदनाने साकडे घातले.Cancel the online exam itself, thousands of students hit the tahsil.

सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो. अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २१४ गुण मिळाले आहेत. या गोंधळामुळे तलाठी भरतीची ही परीक्षा रद्द करा व ऑनलाईन परीक्षाच रद्द करुन ऑफलाईन परिक्षा घ्या असा एकच नारा देत विद्यार्थ्यांत रोष दिसला.

महाराष्ट्र सरकारने टीसीएस कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या असून या कंपनीवर कुठलाही सरकारी खात्याचे नियंत्रण नाही. ही कंपनी परीक्षा घेत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहे. तरी या कंपनीची सखोल चौकशी करून परीक्षा निकालाची पद्धत ही चुकीची दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल नॉर्मलायझेशननुसार लावला जातो. यामध्ये सोप्या प्रश्नांना कमी मार्क व कठीण प्रश्नांना जास्त मार्क कंपनीवर कुठलाही सरकारी खात्याचे नियंत्रण नाही. सदर कंपनी परीक्षा घेत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहे. तरी सरकारने या कंपनीची सखोल चौकशी करून विद्याथ्यांना न्याय देण्यात यावा तसेच परीक्षा निकालाची पद्धत ही चुकीची दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल नॉर्मलायझेशननुसार लावला जातो. यामध्ये सोप्या प्रश्नांना कमी मार्क -व कठीण प्रश्नांना जास्त मार्क देण्यात येतात. त्यामुळे त्या एकंदरीत अॅव्हरेज मार्कमध्ये जास्त मार्क पडले जाते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या निकालात भ्रमित होत आहे. या गोंधळामुळे तलाठी भरतीची ही परीक्षा रद्द करा व ऑनलाईन परीक्षाच रद्द करुन ऑफलाईन परिक्षा घ्या असा एकच नारा देत वणीत हजारों विद्यार्थ्यांत रोष दिसला.यावेळी हजारों विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

 

तलाठी भरतीच्या परीक्षेचे निकाल लागलेले असून या भरतीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण झाली आहे. २०० गुणांची परीक्षा होती.तलाठी भरतीच्या निकालात ४८ उमेदवारांना २००पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर पाच कुटुंबांतील प्रत्येकी दोघे जण गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यामुळे या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोपही सुरू झाले आहे.

अगोदर तलाठी परीक्षा पेपरफुटीचाही मुद्दा पुढे….

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर ५ सप्टेंबर 2023 रोजी तलाठी भरती परीक्षेमध्ये केंद्रबाहेर घडलेला प्रकार होता.तलाठी भरती परीक्षा मध्ये बसलेले परीक्षार्थी हॉल तिकीट मिळवून तलाठी भरती परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना उत्तरे देणाऱ्या आरोपींना उत्तीर्ण करून देण्याची ऑफर देत होते. तसेच परीक्षार्थींना उत्तर पुरवणाऱ्या आरोपींना अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या तपासात २६ हॉल तिकीट आढळून आले. तर परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकाकडे चार मख्खी हेडफोन देखील आढळून आले होते.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page